दहा रुपये द्या, तुमच्या नावाचे पवित्र स्नान मी करतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 12:03 IST2024-01-18T12:02:50+5:302024-01-18T12:03:59+5:30

व्हिडीओमध्ये एक व्यक्ती नदीतील कठड्यावर बसून लोकांना आवाहन करताना दिसते.

Give me ten rupees, I will bathe in your holy name... | दहा रुपये द्या, तुमच्या नावाचे पवित्र स्नान मी करतो...

दहा रुपये द्या, तुमच्या नावाचे पवित्र स्नान मी करतो...

सध्या देशभरात थंडीचा कडाका वाढला आहे. सर्वत्र पारा कमालीचा घसरल्याने अनेकांना हुडहुडी भरली आहे. परंतु बऱ्याच धार्मिकस्थळी तेथील पवित्र नदी वा कुंडात स्नान करण्याची प्रथा-परंपरा आहे. अशा या हाडे गोठवणाऱ्या थंडीत गार पाण्याने स्नान करायचे म्हटले, तर कित्येकांच्या अंगावर काटा येईल. मग अशा आव्हानात्मक परिस्थितीतही व्यवसाय शोधणाऱ्यांचे टॅलेंट हे कौतुकास्पदच म्हणावे लागेल. असाच एक व्हिडीओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ‘एक्स’वर शेअर केला. 

व्हिडीओमध्ये एक व्यक्ती नदीतील कठड्यावर बसून लोकांना आवाहन करताना दिसते. तुम्हाला नदीत स्नान करायची इच्छा आहे, परंतु तुम्हाला शक्य नसेल, तर तुम्ही फक्त दहा रुपयांची पावती फाडा, तुमच्या नावाचे स्नान मी करतो. पवित्र स्नानाचे पुण्य तुम्हाला मिळेल आणि दहा रुपये मला मिळतील, असे गमतीशीर आवाहनही तो करताना दिसतो. 

Web Title: Give me ten rupees, I will bathe in your holy name...