Girls tweet goes viral as she asks for looking a handsome 50 year old man for her mother | ५० वर्षीय आईसाठी पती शोधतेय ही मुलगी, 'या' आहेत मुलाकडून अपेक्षा!
५० वर्षीय आईसाठी पती शोधतेय ही मुलगी, 'या' आहेत मुलाकडून अपेक्षा!

साधारणपणे आपण पाहिलं आणि ऐकलं आहे की,  एक आईच्या तिच्या मुलीसाठी  नवरा मुलगा शोधते. पण याच भूमिका बदलल्या तर? सध्या सोशल मीडियात एक फोटो व्हायरल झाला असून यातील कॅप्शनने अनेकांचा भुवया उंचावल्या आहेत. आस्था वर्मा नावाच्या एका ट्विटर यूजरला तिच्या आईसाठी एका ५० वर्षी सुंदर पती हवा आहे. सोबतच आस्थाने लिहिले आहे की, होणारा पती हा शाकाहारी आणि मद्यसेवन करणारा नको. 

ट्विटरवरील प्रोफाइलनुसार, आस्था एक लॉ स्टुडंट आहे. आस्थाचं हे पाऊल अनेकांना पसंत पडलंय. त्यामुळे तिचं भरभरून कौतुक केलं जात आहे. मुळात अशाप्रकारची कथा सामान्यपणे पुस्तकांमध्ये आणि सिनेमात बघायला मिळतात. ज्यात मुलं आई-वडिलांचे चांगले मित्र असतात. आता ही पोस्ट पाहून भावूक झाले आहेत. इतकेच काय तर काही लोकांनी तर मुलंही सुचवली आहेत.

आस्थाने गुरूवारी ३१ ऑक्टोबरला सायंकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी हे ट्विट केलं होतं. त्यानंतर आतापर्यंत याला  १७.७ हजार लइक्स, तर ७४०० लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत. ज्याप्रमाणे या पोस्टवर  कमेंट येताहेत. त्यानवरून हेच दिसून येतं की, ५० वयातील बरेच लोक जोडीदाराच्या शोधात आहेत.

एका व्यक्तीने आस्थाला मॅट्रिमोनिअल साइटवर जाण्याचा सल्ला दिला. त्यावर आस्थाने उत्तर दिलं की, तिने सगळीकडे शोधलं पण चांगला मुलगा मिळाला नाही. 


Web Title: Girls tweet goes viral as she asks for looking a handsome 50 year old man for her mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.