VIDEO : तरूणीने बॉयफ्रेंडला रंगेहाथ दुसऱ्या तरूणीसोबत पकडलं आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 15:22 IST2023-03-22T15:21:00+5:302023-03-22T15:22:00+5:30

Viral Video : तरूणी आपल्या बॉयफ्रेंडला रस्त्यावरच मारत आहे. तरूण आणि एका दुसऱ्या तरूणीसोबत रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये डीनर करताना दिसत आहे.

Girlfriend caught cheater boyfriend red handed on road video viral | VIDEO : तरूणीने बॉयफ्रेंडला रंगेहाथ दुसऱ्या तरूणीसोबत पकडलं आणि मग....

VIDEO : तरूणीने बॉयफ्रेंडला रंगेहाथ दुसऱ्या तरूणीसोबत पकडलं आणि मग....

Girlfriend Caught Boyfriend: एका तरूणीने आपल्या बॉयफ्रेंडला रंगेहाथ पकडण्याचा एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओत तरूणाला एका दुसऱ्या तरूणीसोबत डिनर डेटवर बसलेले बघू शकता. पण जेव्हा त्याच्या पार्टनरला याबाबत समजलं तेव्हा त्याला झटका बसला. व्हिडिओत दिसत आहे की, तरूणी आपल्या बॉयफ्रेंडला रस्त्यावरच मारत आहे. तरूण आणि एका दुसऱ्या तरूणीसोबत रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये डीनर करताना दिसत आहे.

व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, डीनर डेटवर तरूण जेवणाचा आनंद घेत आहे. तेवढ्यात एक कार वेगाने तिथे येऊन थांबते आणि कारमधून उतरलेली एक तरूणी तरूणासोबत मारहाण करते. नाराज गर्लफ्रेंडने त्याच्यावर खुर्ची फेकली आणि नंतर बॉटलमधील सॉस त्याच्या अंगावर फेकला. अशात कारमधून तरूणीसोबत आलेला व्यक्ती तिला रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनला आहे. व्हिडिओत बघू शकता की, तरूणाने आपल्या गर्लफ्रेंडला दगा देऊन एका दुसऱ्याच तरूणीला डेटवर घेऊन गेला. हे अजूनही स्पष्ट नाही की, तरूण आणि तरूणी विवाहित होते की, एकमेकांना डेट करत होते. आतापर्यंत या व्हिडिओला 3 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर लोक यावर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.

Web Title: Girlfriend caught cheater boyfriend red handed on road video viral