VIDEO : गेमिंग झोनमध्ये तरूणीसोबत झालं असं काही, थेट पडली तोंडावर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 17:43 IST2022-05-10T17:41:09+5:302022-05-10T17:43:14+5:30
Viral Video : व्हिडीओत एक तरूणी एका बॉलला हिट करताना दिसत आहे. पण हिट केल्यावर तिचा बॅलन्स बिघडतो आणि ती तोंडावर खाली पडते.

VIDEO : गेमिंग झोनमध्ये तरूणीसोबत झालं असं काही, थेट पडली तोंडावर...
Girl Fell Down After Hitting The Ball: ताकद आणि बॅलन्सचा योग्य वापर केला तर तुम्ही कोणत्याही खेळात शेवटपर्यंत टिकून रहाल. जर एकही गोष्ट कमी असेल तर तुमची खिल्ली उडवली जाऊ शकते. सोशल मीडियावर याचंच उदाहरण देणारा एका व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका तरूणीला ताकद दाखवणं महागात पडलं आहे. व्हिडीओत एक तरूणी एका बॉलला हिट करताना दिसत आहे. पण हिट केल्यावर तिचा बॅलन्स बिघडतो आणि ती तोंडावर खाली पडते.
या इन्स्टाग्रामवरील व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक तरूणी गेमिंग झोनमध्ये आहे. तिला इथे तिच्या ताकदीचं प्रदर्शन करायचं आहे. तिने ताकद दाखवण्यासाठी बॉलला हिट करण्याच्या गेमची निवड केली. तरूणी पूर्ण ताकद लावून बॉलला हिट करते. पण ती दोन सेकंदही स्वत:ला सांभाळू शकली नाही. बॉलला हिट करताना तरूणी खाली पडते. तरूणीला पडताना बघून तिचे मित्र ओरडू लागतात.
हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्रामवर हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला. लोक हा व्हिडीओ बघून पोट धरून हसतही आहेत आणि त्यांना तरूणीबद्दल वाईटही वाटत आहे. पण यावरून हे स्पष्ट होतं की, ताकद आणि बॅलन्सचा वापर योग्यपणे करावा नाही तर असं काही होतं.