रील के लिए कुछ भी करेगा...! तरूणीचा व्हिडीओ पाहून संतापले लोक, सुनावले खडे बोल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 16:48 IST2025-02-19T16:48:30+5:302025-02-19T16:48:56+5:30

Viral Video : व्हिडिओत एक तरूणी आपला जीव धोक्यात टाकून रेल्वेच्या गेटमध्ये लटकून रील बनवताना दिसत आहे.

Girl making reel on running train by hanging on gate, people gets angry | रील के लिए कुछ भी करेगा...! तरूणीचा व्हिडीओ पाहून संतापले लोक, सुनावले खडे बोल!

रील के लिए कुछ भी करेगा...! तरूणीचा व्हिडीओ पाहून संतापले लोक, सुनावले खडे बोल!

Girl Making Reel On Running Train By Hanging On Gate: रील बनवण्याच्या नादात आणि सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी लोक आजकाल वाट्टेल ते करू लागले आहेत. कधी कधी तर असे काही काही रील्स समोर येतात जे बघून धडकी भरते आणि संतापही येतो. असाच एक संताप आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो बघून तुम्हालाही धडकी भरेल आणि तुम्हीही इतर यूजर्स प्रमाणे या तरूणीलाही खडे बोल ऐकवाल. व्हिडिओत एक तरूणी आपला जीव धोक्यात टाकून रेल्वेच्या गेटमध्ये लटकून रील बनवताना दिसत आहे. तरूणीचा हा व्हिडीओ बघून लोकांनी संताप व्यक्त केला आहे, तर काही लोक कौतुक करत आहेत.

रील्स के लिए साला कुछ भी करेगा...

व्हायरल व्हिडिओत बघू शकता की, तरूणी केवळ एका रील्सच्या नादात आपला जीव धोक्यात टाकत आहे. तरूणी रेल्वेच्या गेटमध्ये कुणाचा तरी हात धरून बाहेर डोकावत आहे. बाहेरच्या बाजूनं लटकून काही डान्स स्टेप्सही करत आहे. तरूणीचा हा अतिउत्साह पाहून लोकांनी तिला चांगलंच सुनावलं आहे. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं की, 'जास्त हिरोईन नको बनू, नंतर पश्चाताप होईल'. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ @saiba__19 नावाच्या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. 

लोकांनी सुनावले खडे बोल

व्हिडिओतील तरूणीचा स्टंट बघून अनेक यूजर्सनी तिला चांगलंच सुनावलं आहे. सोबतच काही लोकांनी तिचं कौतुकही केलंय. साधारण १४ सेकंदाचा हा व्हिडीओ बघितल्यावर एका यूजरनं लिहिलं की, 'रील बनवण्यासाठी जीवावर उठली आहे'. दुसऱ्यानं लिहिलं की, 'सगळं काही ठीक आहे, पण असे व्हिडीओ नका बनवत जाऊ. काय माहीत एखाद्या दिवशी काही दुर्घटना घडेल'. तिसऱ्यानं लिहिलं की, 'आपल्याच जीवासोबत का खेळत आहे'.

Web Title: Girl making reel on running train by hanging on gate, people gets angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.