विचित्रपणा! चघळलेलं च्युइंगम विकून तरूणीनं केली रग्गड कमाई, आकडा वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 10:58 IST2025-02-03T10:56:31+5:302025-02-03T10:58:03+5:30

Viral News: ही तरूणी तिनं खाल्लेलं च्युइंगम ऑनलाईन विकून पैसे कमावत आहे. तिनं खाल्लेलं च्युइंगम घेण्यासाठी लोक भरपूर पैसे देतात.

Girl earned 75 thousand rupees by selling chewed chewing gum | विचित्रपणा! चघळलेलं च्युइंगम विकून तरूणीनं केली रग्गड कमाई, आकडा वाचून व्हाल अवाक्...

विचित्रपणा! चघळलेलं च्युइंगम विकून तरूणीनं केली रग्गड कमाई, आकडा वाचून व्हाल अवाक्...

Viral News: आजकाल लोक कोणत्या गोष्टी करून पैसे कमावतील काहीच भरोसा नाही. लोक असे असे उद्योग करत आहेत, ज्यावर विश्वासही बसत नाही. कुणी मीठी मारून पैसे कमावत आहेत, तर कुणी घाम विकून पैसे कमावत आहेत. आता ब्राझीलच्या एका कंन्टेन्ट क्रिएटरनं विचित्र काम करून पैसे कमावणं सुरू केलं आहे. ही तरूणी तिनं खाल्लेलं च्युइंगम ऑनलाईन विकून पैसे कमावत आहे. तिनं खाल्लेलं च्युइंगम घेण्यासाठी लोक भरपूर पैसे देतात. आतापर्यंत या तरूणीनं या बिझनेसमधून ७५ हजार रूपये जमा केले आहेत.

ब्राझीलची २१ वर्षीय मॉडल आणि कंन्टेन्ट क्रिएटर काइन चॅन सध्या तिच्या अनोख्या बिझनेसमुळे चर्चेत आहे. 'नीड टू नो' वेबसाईटनुसार, काइन आपलं खाल्लेलं च्युइंगम पुरूषांना विकून चांगली कमाई करत आहे. इन्स्टाग्रामवर काइनचे साधारण ९ लाख फॉलोअर्स आहेत. त्याशिवाय ओन्लीफॅन्सवर प्रायव्हेट व्हिडिओज आणि फोटो पोस्ट करूनही ती पैसे कमावते. 

अलिकडे काइन चॅननं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करून या अनोख्या बिझनेसबाबत सांगितलं आहे. व्हिडिओत ती च्युइंगम चघळताना दिसत आहे आणि या बिझनेसची आयडिया कशी आले हे ती सांगत आहे. ती म्हणाली की, एका फॉलोअरनं तिला मेसेज करून अजब डिमांड केली होती. त्याला काइनचं चघळलेलं च्युइंगम खरेदी करायचं होतं आणि यासाठी तो भरपूर पैसेही द्यायला तयार होता. या फॅनची अट होती की, काइनने च्युइंगम सोबतच एक नोटही पाठवावी. जेणेकरून हे स्पष्ट होईल की, च्युइंगम तिनेच खाल्लेलं आहे.

काइननं सांगितलं की, लोक तिला मेसेज करून अजब अजब डिमांड करतात. एकदा एका व्यक्तीनं तिला ८ लाख रूपये ऑफर केले होते, याबदल्यात त्याला काइनचे सॉक्स आणि अंडरगारमेंट्स खरेदी करायचे होते. आता लोक तिने खाल्लेलं च्युइंगम विकत घेण्यासाठी तिला पैसे देत आहेत.
 

Web Title: Girl earned 75 thousand rupees by selling chewed chewing gum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.