नादखुळा! ट्रान्सफार्मरवर चढून प्रियकराची वाट बघत होती तरूणी, वायर पकडून नाचली आणि...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 16:10 IST2024-12-31T16:09:44+5:302024-12-31T16:10:38+5:30
Viral Video : आज आम्ही तुम्हाला एका तरूणीचा व्हिडीओ दाखवणार आहोत. ही तरूणी तिच्या प्रियकराची वाट बघत आहे. प्रियकराची वाट बघत ती ट्रान्सफार्मरवर चढली आहे.

नादखुळा! ट्रान्सफार्मरवर चढून प्रियकराची वाट बघत होती तरूणी, वायर पकडून नाचली आणि...
Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक आजकाल कोणत्याही सीमा पार करायला तयार असतात. कुणी धावत्या रेल्वेवर लटकून व्हिडीओ काढतात तर कुणी नवरीचे कपडे घालून बाईक चालवताना दिसतात. तर काही लोक डोंगराच्या काठावर उभे राहून व्हिडीओ बनवतात. विचित्र डान्सचे तर शेकडो व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अशात आज आम्ही तुम्हाला एका तरूणीचा व्हिडीओ दाखवणार आहोत. ही तरूणी तिच्या प्रियकराची वाट बघत आहे. प्रियकराची वाट बघत ती ट्रान्सफार्मरवर चढली आहे.
इन्स्टग्रामवर हा व्हिडीओ योगेश पटेलने शेअर केला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, एक तरूणी तिच्या प्रियकराची वाट बघत आहे. ती शेतातील ट्रन्सफार्मरवर चढून गाण्यावर डान्स करत आहे. डान्स करत असताना ती ट्रन्सफार्मरच्या उघड्या तारांनाही हात लावते. एका सेकंदासाठी तर असं वाटतं की, तिचा शॉक लागेल. पण सुदैवाने लाइट गेलेली आहे. तरूणीला जीवाची अजिबातच काळजी नाही असं यातून दिसतं.
इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ७७ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तेच ८१ हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं आहे. तर २ लाख २५ हजारांपेक्षा जास्तवेळा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. इतकंच नाही तर यूजर्स यावर वेगवेगळ्या कमेंट्सही करत आहेत. १७ हजारांपेक्षा जास्त लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. जास्तीत जास्त लोकांनी तरूणीचा हा मूर्खपणा असल्याचं म्हटलं आहे.