जिराफाला सतवत होता गेंडा, जिराफाने अशी अद्दल घडवली की आयुष्यभर लक्षात ठेवेल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 07:00 PM2021-11-28T19:00:49+5:302021-11-28T19:05:06+5:30

गेंड्याला जिराफ धडा शिकवताना दिसत आहे. जिराफाने गेंड्याला अशी काही शिक्षा दिली, की तो आजन्म लक्षात ठेवेल.

giraffe kicks rhino video goes viral on social media | जिराफाला सतवत होता गेंडा, जिराफाने अशी अद्दल घडवली की आयुष्यभर लक्षात ठेवेल

जिराफाला सतवत होता गेंडा, जिराफाने अशी अद्दल घडवली की आयुष्यभर लक्षात ठेवेल

googlenewsNext

जिराफांची गणना जंगलातील अतिशय शांत प्राण्यांमध्ये केली जात असली, तरी कुणी त्याला त्रास देण्याचा विचार करत असेल तर हा प्राणी चांगलाच धडा शिकवू शकतो. सध्या असाच काहीसा प्रकार समोर आला आहे, जिथं एका गेंड्याला जिराफ धडा शिकवताना दिसत आहे. जिराफाने गेंड्याला अशी काही शिक्षा दिली, की तो आजन्म लक्षात ठेवेल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक गेंडा जिराफाजवळ येतो आणि त्याला त्रास देऊ लागतो, जिराफ बराच वेळ त्याची चेष्टा सहन करतो, पण जेव्हा पाणी डोक्यावरुन जातं, तेव्हा तो गेंड्याच्या तोंडावर अशी लाथ मारतो, की गेंडा लगेच पळून जातो.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांना खूप आवडला आहे. यावर अनेक युजर्सनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘हा गेंडा कुणालाही त्रास देण्याआधी नक्कीच शंभर वेळा विचार करेल.’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘जिराफाची लाथ गाढवाच्या लाथेपेक्षा जास्त शक्तिशाली आहे.’ अजून एकाने लिहले, ‘गेंड्यांला दिवसा तारे दिसले असतील. याशिवाय अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

हा मजेदार व्हिडिओ भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. ज्यासोबत त्यांनी कॅप्शन लिहिले आहे की, ‘आता गेंडा जिराफाची लाथ आयुष्यभर लक्षात ठेवेल.’ बातमी लिहिपर्यंत २५ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Web Title: giraffe kicks rhino video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.