शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
3
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
4
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
5
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
6
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
7
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
8
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
9
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
10
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
11
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
12
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
13
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
14
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली
15
चमत्कार! "मी वर तरंगत होते अन् माझं शरीर..."; १७ मिनिटांचा 'मृत्यू', महिलेसोबत काय घडलं?
16
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
17
तूर्त अभय! माणिकराव कोकाटेंना शनिदेवच पावला; अजित पवारांनी सुनावले, पण मंत्रीपद कायम ठेवले
18
IND vs ENG 5th Test India Playing XI : करुण नायरला 'वन मोअर चान्स'; टीम इंडियात ४ बदल
19
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
20
हवेतच हेलकावे खाऊ लागले विमान, प्रवाशांचे प्राण संकटात, कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप, अखेर...

स्टेडिअममध्ये बॉल जवळ आला अन् कॅच पकडायला गेली, पुढे असे काही झाले की..शरमेने झाली लाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 14:49 IST

स्टेडियममध्ये मॅच बघायला आलेल्या एका तरूणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात ही तरूणी स्टॅन्ड्समध्ये बसून मॅच पाहतेय, आणि तिच्याकडे आलेला बॉल (ball)पकडायला गेल्यावर तिची चांगलीच फजिती झालीय.

आपल्यापैकी अनेकांना टीव्हीपेक्षा (television) प्रत्यक्ष स्टेडियमवर (stadium) जाऊन कुठल्याही खेळाचे (sports) सामना पाहायला आवडतात. स्टेडियमवर प्रत्यक्ष जाऊन मॅच (watching match)पाहण्यात वेगळा आनंद तर मिळतोच शिवाय, तिथं ज्या गमतीजमती होतात त्या अतिशय भन्नाट असतात. स्टेडियममध्ये मॅच बघायला आलेल्या अशाच एका तरूणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात ही तरूणी स्टॅन्ड्समध्ये बसून मॅच पाहतेय, आणि तिच्याकडे आलेला बॉल (ball)पकडायला गेल्यावर तिची चांगलीच फजिती झालीय. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर तो जबरदस्त व्हायरल होतोय. नेटिझन्स या तरूणीचे हावभाव पाहून हसून बेजार झालेत. ( funny video of a young woman catching ball during baseball match is going viral)

व्हिडीओमध्ये एक तरूणी आपल्या मित्रांसोबत बेसबॉलची मॅच पहायला आली आहे. यावेळी खेळाडूने मारलेला बॉल तिच्या दिशेने येतो, ती बॉल पकडण्यासाठी उत्साहित होऊन पुढे येते आणि कॅच पडणार तेवढ्यात तिच्या समोर असलेला छोटा मुलगा बॉल पकडतो आणि या तरुणीची फजिती होते.

सुरूवातीला आपण कॅच पकडणारच असा आत्मविश्वास तरूणीच्या चेहऱ्यावर असतो, पण तेवढ्यात समोरचा मुलगा कॅच पकडतो आणि तिच्या चेहऱ्याचा रंगच बदलून जातो. तरूणीची फजिती झाल्याने तिच्यासोबत आलेले तिचे मित्र जोरजोरात हसू लागतात आणि त्यामुळे ही मुलगी शरमेनं लाल होते.

तरूणीच्या शेजारी बसलेला तिच्या मित्राने तर तिच्या फजितीची पूर्ण मजा घेतली. पण नंतर एका चांगल्या मित्राप्रमाणे तिच्या खांद्यावर हात ठेवत, ”जाऊदे, असं होत असतं. वाईट वाटून घेऊ नको”, असं म्हणत तिची समजूत काढली.

या तरूणीच्या फजितीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सही या व्हिडीओला पाहून खळखळून हसले. अनेकांनी त्यावर कमेंट्सही केल्या आहेत. ‘गजब बेज्जती हो गई यार’, ‘वाह बेटे मौज कर दी’ अशा काही मजेशीर कमेंट्स या व्हिडीओखाली आल्या आहेत. या व्हिडीओला इन्स्टाग्रामवर आतापर्यंत 1 लाख व्ह्यूज आले आहेत तर अनेकांनी तो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअरही केला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामWomenमहिलाTelevisionटेलिव्हिजनBaseballबेसबॉल