Viral Video: उतावळा नवरा...! सर्वांसमोर नवरदेवाने नवरीला असं केलं किस, बघून 'कोमात' गेले लोक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 12:59 IST2021-12-17T12:58:48+5:302021-12-17T12:59:06+5:30
Bride Groom Kissing Viral Video: आता तर एक असा व्हिडीओ व्हायरल झाला जो बघून तुम्ही कपाळावर हात मारून घ्याल. कारण लग्नातील असा व्हिडीओ तुम्ही याआधी कधी पाहिला नसेल.

Viral Video: उतावळा नवरा...! सर्वांसमोर नवरदेवाने नवरीला असं केलं किस, बघून 'कोमात' गेले लोक
Bride Groom Kissing Viral Video: देशात सध्या लग्नाचा सीझन धडाक्यात सुरू आहे. त्यामुळे सोशल मीडियावरही लग्नांच्या मजेदार व्हिडीओंचा पाऊस पडत आहे. यातील काही व्हिडीओ पाहून पोटधरून हसण्याची वेळ येत तर काही व्हिडीओ पाहून थक्क व्हायला होतं. आता तर एक असा व्हिडीओ व्हायरल झाला जो बघून तुम्ही कपाळावर हात मारून घ्याल. कारण लग्नातील असा व्हिडीओ तुम्ही याआधी कधी पाहिला नसेल. हा व्हिडीओ पाहून लोक खाली लोळून लोळून हसत आहेत.
लग्नात अनेक नवरी-नवरदेव असं काही करतात की, सर्वांचं लक्ष वेधून घेतात. तर कधी कधी नवरी-नवरदेवांचे मित्र धमाल करतात. पण या लग्नात नवरी-नवरदेवाने असं काही केलं जे बघून लोक थक्क झाले आहेत. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, लग्नाचे रिती-रिवाज पार पाडले जात आहेत. नवरी-नवरदेवासोबत अनेक लोक बसले आहेत. अशातच नवरी-नवरदेव एकमेकांना किस करू लागतात. अचानक नवरदेवाने केलेल्या या कारनाम्यामुळे लोक जोरजोरात हसू लागतात.
हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू फुटलं असेल. विचार करत असाल की, नवदेवाला तर फारच घाई झाली आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांना हसू आवरता येत नाहीये. कारण हा काही साधासुधा किस नव्हता. नवरदेवाने नवरीला करकचून किस केला. हा व्हिडीओ 'official_viralclips' नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला हजारो व्ह्यूज आणि शेकडो लाईक्स मिळाले आहेत.