Funny Video : 'धडकन' मधील गाण्यावर सुनील शेट्टी बनत होता तरूण, गर्लफ्रेन्डने मारली मागून लाथ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 16:36 IST2021-04-07T16:36:10+5:302021-04-07T16:36:36+5:30
सोशल मीडियाची दुनिया ही चांगलीच मजेदार आहे. इथे रोज काहीना काही नवीन येत राहतं आणि अनेकदा तर जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल होतो.

Funny Video : 'धडकन' मधील गाण्यावर सुनील शेट्टी बनत होता तरूण, गर्लफ्रेन्डने मारली मागून लाथ!
सोशल मीडियावर नेहमीच काही मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक कपलचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक मजेदार रिअॅक्शन देत आहेत. कारण या व्हिडीओतील डायलॉग सर्वांना आवडलाय.
सोशल मीडियाची दुनिया ही चांगलीच मजेदार आहे. इथे रोज काहीना काही नवीन येत राहतं आणि अनेकदा तर जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल होतो. सध्या एका व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. जसे की, व्हिडीओमध्ये पाहिलं जाऊ शकतं की, एक कपल पाण्यात बसलं आहे आणि बॅकग्राऊंडमध्ये एक डायलॉग सुरू आहे. हा डायलॉग धडकन या सिनेमातील आहे.
सुनील शेट्टी, शिल्पा शेट्टी यांच्या धडकन सिनेमातील सगळेच डायलॉग खूप फेमस झाले होते. इतकंच काय तर गाणीही सुपरहिट झाली होती. काही गाण्यांमध्ये डायलॉगही होते. जे चांगलेच गाजले. त्यातीलच एक डायलॉग या व्हिडीओ वापरला आहे. ज्यावर कपलने मजेदार व्हिडीओ तयार केला. हा व्हिडीओ तुम्हालाही नक्कीच हसू येईल.