VIDEO: लाईव्ह डिबेटमध्ये मंत्री महोदय रागाने थुंकले; व्हिडीओ व्हायरल होताच झाले ट्रोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 17:32 IST2022-08-04T17:29:03+5:302022-08-04T17:32:40+5:30

लाईव्ह डिबेटमध्ये मंत्री महोदय थुंकल्याचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

Former Pakistan Minister Sheikh Rasheed Ahmed spitting in live debate, video goes viral | VIDEO: लाईव्ह डिबेटमध्ये मंत्री महोदय रागाने थुंकले; व्हिडीओ व्हायरल होताच झाले ट्रोल 

VIDEO: लाईव्ह डिबेटमध्ये मंत्री महोदय रागाने थुंकले; व्हिडीओ व्हायरल होताच झाले ट्रोल 

नवी दिल्ली : हे सोशल मीडियाचे युग आहे इथे कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही. सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही भन्नाट गोष्टी व्हायरल होत असतात. व्हायरल होणाऱ्या काही गोष्टी नेटकऱ्यांचे मनोरंजन करतात तर काही गोष्टी खरोखरच विचार करण्यास भाग पाडतात. सध्या लाईव्ह टीव्ही डिबेटमध्ये मंत्री महोदय थुंकल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मंत्री साहेब रागामध्ये चालू डिबेटमध्ये थुंकतात ज्याची नेटकरी खूप खिल्ली उडवत आहेत. लाईव्ह डिबेटमध्ये अनेकवेळा राजकारणी लोकांचा राग अनावर झाल्याचा पाहायला मिळतो. यापूर्वी देखील लाईव्ह डिबेटमध्ये मारहाण झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाकिस्तानमधील माजी मंत्री शेख रशीद अहमद यांचा आहे. व्हिडीओमध्ये रशीद अहमद लाईव्ह डिबेटमध्ये थुंकताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पत्रकार नाइला इनायत यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे, ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे. नेटकरी आता शेख रशीद यांच्या या कृत्याची खूप खिल्ली उडवत आहेत. हे नक्की डिबेट चालू आहे की कट्ट्यावरची भांडणं असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नेटकऱ्यांनी साधला निशाणा
शेख रशीद पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांच्याबद्दल भाष्य करत होते, तेवढ्यात त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी अनोख्या पद्धतीने आपला संताप व्यक्त केला. गृहमंत्र्यावर टीका करताना ते एवढे संतापले होते की ते रागात चक्क थुंकले. दरम्यान, त्यांनी केलेल्या या कृत्यामुळे ते सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहेत. एका माजी मंत्र्याला बोलण्याचे भान कसे नाही याबाबत विचारणा केली जात आहे. व्हिडीओ शेअर करताना पत्रकाराने देखील नकळत त्यांची खिल्ली उडवली आहे. 


 

Web Title: Former Pakistan Minister Sheikh Rasheed Ahmed spitting in live debate, video goes viral