Video : वाह, चिमुरड्यानं अनवाणी पायांनी केलेली बॅटींग पाहून तुम्हीही म्हणाल,... शानदार शॉट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 18:18 IST2020-10-05T18:13:40+5:302020-10-05T18:18:07+5:30
Viral video Marathi : हा व्हिडीओ पाहून क्रिकेटप्रेमी नसलेल्यांच्याही चेहऱ्यावर हसू आलं आहे.

Video : वाह, चिमुरड्यानं अनवाणी पायांनी केलेली बॅटींग पाहून तुम्हीही म्हणाल,... शानदार शॉट!
सध्या आयपीएल सुरू असल्यामुळे क्रिकेटप्रेमी रोजच आपला आवडता खेळ पाहण्याचा आनंद घेत आहे. सोशल मीडियावर सध्या एका चिमुरड्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून क्रिकेटप्रेमी नसलेल्यांच्याही चेहऱ्यावर हसू आलं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक चिमुरडा अनवाणी पायांनी जबरदस्त बॅटींग करताना दिसत आहे. हा व्हिडीओ टीम इंडियाचे माजी खेळाडू आकाश चोपडा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
No shoes. No problem. #AakashVanipic.twitter.com/n9MPuFa8KO
— Aakash Chopra (@cricketaakash) October 3, 2020
या व्हिडीओला त्यांनी शानदार असं कॅप्शनही दिलं आहे की, जर तुम्हाला उडायचं असेल तर पायांमध्ये चपला नाही तर विचारांमध्ये पंख असावे लागतात. हा व्हिडीओ ३ ऑक्टोबरला शेअर करण्यात आला होता. कॅप्शन वाचल्यानंतर हा व्हिडीओ प्रेरणादायी असल्याचे लक्षात येते. एखाद्या अनुभवी क्रिकेटपटूप्रमाणे हा चिमुरडा बॅटिंग करत आहे.
आतापर्यंत ४ लाखांपेक्षा जास्तवेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे. जवळपास ३० हजारांपेक्षा जास्त लाईक्स आणि ३ हजारांपेक्षा जास्त रिट्विट्स या व्हिडीओला मिळाले आहेत. सोशल मीडिया युजर्सना हा व्हिडीओ तुफान आवडला आहे. तर काही लोकांनी हा व्हिडीओ पाहून छोटा सचिन तेंडूलकर असल्याचेही म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वीही असाच एका मुलीचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. परी शर्मा नावाच्या या मुलीचं वय फक्त ७ वर्ष होतं. पण क्रिकेट खेळताना मात्र एखाद्या अनुभवी आणि मोठ्या खेळाडूप्रमाणे खेळत होती. परीला मोठं होऊन क्रिकेटपटू व्हायचं आहे. असं तिने सांगितले होते. इंस्ट्राग्रामवर परीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात.