बाईकच्या पेट्रोल टँकमध्ये फोडला फटाका; पुढे काय झाले? पाहा धक्कादायक व्हिडिओ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 17:33 IST2024-10-29T17:32:55+5:302024-10-29T17:33:30+5:30
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बाईकच्या पेट्रोल टँकमध्ये फोडला फटाका; पुढे काय झाले? पाहा धक्कादायक व्हिडिओ...
Viral Video : आजच्या सोशल मीडियाच्या काळात प्रत्येकाला फेमस व्हायचे आहे. आजकाल अनेकजण इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर सारख्या सोशल मीडिया साइट्सवर लोकप्रिय होण्यासाठी विविध गोष्टी करतात. कधी भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होतो, तर कधी डान्सचा व्हिडिओ व्हायरल होतो. दरम्यान, दिवाळीमुळे अनेकांचे फटाके फोडण्याचे व्हिडिओही व्हायरल होत आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये काय?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या बाईकच्या पेट्रोल टाकीत बॉम्ब फोडताना दिसतोय. पेट्रोलची टाकी बघून बाईक बरीच जुनी असावी. टाकीत बॉम्ब फोडल्यानंतर पेट्रोल टाकी आणि सीट हवेत फेकले जातात. हा व्हिडीओ कधीचा आणि कुठला आहे, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, दिवाळीमुळे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ पाहा
शाबाश बेटा 😆 😂
— Nisha (@y_iamcrazyy) October 28, 2024
अपनी बाइक की पेट्रोल की टंकी में सुतली बम डालकर जला दिया, आगे देखो अब क्या हुआ pic.twitter.com/cD3tx6ooII
हा व्हिडिओ X प्लॅटफॉर्मवर @y_iamcrazyy नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. वृत्त लिहेपर्यंत हा व्हिडिओ 3.5 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी यावर मजेशीर कमेंट्स करत आहेत.