रेल्वेस्थानकावर समुद्रसपाटीपासूनची उंची का लिहिलेली असते, जाणून घ्या त्यामागचे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 16:52 IST2022-11-01T16:52:35+5:302022-11-01T16:52:47+5:30
रेल्वेस्थानकाचा आणि आपला नेहमी संबंध येतो. रेल्वेने रोज लाखो लोक प्रवास करतात. देशात रेल्वेने प्रवास स्वस्तात होतो. कमी वेळेतही आपल्याला इच्छित स्थळी पोहोचवते.

रेल्वेस्थानकावर समुद्रसपाटीपासूनची उंची का लिहिलेली असते, जाणून घ्या त्यामागचे कारण
रेल्वेस्थानकाचा आणि आपला नेहमी संबंध येतो. रेल्वेने रोज लाखो लोक प्रवास करतात. देशात रेल्वेने प्रवास स्वस्तात होतो. कमी वेळेतही आपल्याला इच्छित स्थळी पोहोचवते. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. रेल्वेस्थानकावर गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या सूचना लिहिलेल्या पाहायला मिळतात. यात समुद्रसपाटीपासूनची उंचीही लिहिलेली असते. अनेकांना हा प्रश्न पडलेला असतो की, स्थानकावर ही माहिती का लिहिलेली असते. चला जाणून घेऊया या मागचे कारण.
जेव्हा तुमची ट्रेन रेल्वे स्टेशनवरून जाते तेव्हा तुमच्या लक्षात आले असेल की प्लॅटफॉर्मच्या दोन्ही बाजूला स्टेशनच्या नावाचा मोठा पिवळा बोर्ड आहे. त्यावर स्टेशनचे नाव वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिलेले असते. यापैकी एक भाषा इंग्रजी असते, इतर दोन भाषा वेगवेगळ्या असतात.
पीक काढण्यापूर्वीच चांगला भाव देण्याचा प्रयत्न; केंद्रीय कृषीमंत्र्यांचे आश्वासन
त्या स्थानकाची समुद्रसपाटीपासूनची उंची हे स्थानकाच्या नावासह फलकावर लिहिलेले असते. ट्रेनच्या ड्रायव्हरसाठी ते खूप महत्वाचे आहे. समुद्रसपाटीपासूनच्या या उंचीवरून ट्रेनचा ड्रायव्हर पुढच्या प्रवासाचा अंदाज लावू शकतो.त्यानुसार रेल्वेचा चालक इंजिनचा वीजपुरवठा आणि वेग ठरवतो. जेणेकरून ट्रेन इच्छित स्थळी सहज पोहोचू शकेल.