अवघ्या १० सेकंदात या जंगलातील फोटोत एक पक्षी शोधून दाखवा; भलेभले अपयशी ठरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 14:24 IST2022-07-13T14:24:47+5:302022-07-13T14:24:58+5:30
हा फोटो तुम्ही पाहिला तर त्यात एक जंगल दिसून येते. या संपूर्ण जंगलात हिरवीगार झाडी नजरेस पडतील.

अवघ्या १० सेकंदात या जंगलातील फोटोत एक पक्षी शोधून दाखवा; भलेभले अपयशी ठरले
सोशल मीडियावर नेहमी काही ना काही क्विज अथवा चँलेंज देणारे फोटो व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यात एखाद्या फोटोत लपलेली गोष्ट शोधून दाखवायची असते. हे फोटो असे असतात जे तुमच्या डोळ्यांना सहजपणे दिसत नाहीत. या फोटोत दडलेली ती गोष्ट शोधून काढण्यासाठी अनेकजण प्रयत्न करतात परंतु त्यांना शेवटपर्यंत यश येत नाही. अनेकजण डोक्यावर हात मारतात मात्र फोटोत दडलेली गोष्ट शोधू शकत नाही. आता आम्ही तुम्हाला असाच एक फोटो दाखवत आहे ज्यात तुम्हाला एक पक्षी शोधून दाखवायचा आहे.
काय आहे फोटोत?
हा फोटो तुम्ही पाहिला तर त्यात एक जंगल दिसून येते. या संपूर्ण जंगलात हिरवीगार झाडी नजरेस पडतील. परंतु तुम्हाला या फोटोत दडलेला एक पोपट शोधून काढायचा आहे. या झाडीत एक पोपट लपलेला आहे. हा फोटो शोधण्यासाठी तुमच्याकडे अवघे १० सेकंद असतील. त्यामुळे नजर फिरवा आणि या फोटोत लपलेला पोपट शोधा.
तुम्हाला दिसला का जंगलातील पोपट? जर तुम्ही पटकन् ओळखलं असेल तर तुम्ही जिनियस कॅटेगिरीत आहात. जर नसेल सापडला तर आम्ही तुम्हाला या फोटोत दडलेला पोपट शोधून दाखवतो. पोपट बरोबर तुमच्या नजरेसमोर बसला आहे. परंतु तो इतक्या चतुराईने लपलाय ज्यामुळे भलेभले लोक त्याला शोधू शकत नाहीत.
पोपट हा डाव्या बाजूकडील पानांमध्ये एका फांदीवर बसलेला तुम्हाला दिसून येईल. जर तुम्ही व्यवस्थित हा फोटो पाहिला तर तुमची नजर फोटोच्या डाव्या बाजूस पडेल. त्याठिकाणी कोपऱ्यात पोपट नजरेस पडेल.