Video: महिला ग्राहकांचं गैरवर्तन; वेटरने 'असा' शिकवला दोघींना धडा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 13:15 IST2018-11-09T13:15:03+5:302018-11-09T13:15:58+5:30
आपण अनेकदा रेस्टॉरंटमध्ये जातो तेव्हा तेथील वेटर हे आपल्याशी किती विनम्रपणे वागतात हे सर्वांनाच माहीत आहे.

Video: महिला ग्राहकांचं गैरवर्तन; वेटरने 'असा' शिकवला दोघींना धडा!
आपण अनेकदा रेस्टॉरंटमध्ये जातो तेव्हा तेथील वेटर हे आपल्याशी किती विनम्रपणे वागतात हे सर्वांनाच माहीत आहे. पण काही लोक हे या वेटर्सना कमी लेखतात आणि त्यांच्याशी वाईट वर्तणूक करणे आपला जन्मसिद्ध अधिकार समजतात. आपल्या नौकरासारखी वागणूक त्यांना दिली जाते.
चूक कुणाचीही असली तरी रेस्टॉरंटचा मालकही वेटरलाच रागावणार हेही ठरलेलंच. पण सोशल मीडियात सध्या एका वेटरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात वेटरने दोन बेशिस्त महिला ग्राहकांच्या तोंडावरच केक मारला आहे. रिपोर्टनुसार, या महिलांनी वेटरसोबत गैरवर्तन केलं होतं.
ही घटना यूक्रेनच्या एका रेस्टॉरंटमधील आहे. येक्रेनची राजधानी Keiv मध्ये असलेल्या Guramma Italiana रेस्टॉरंटमध्ये दोन महिला गेल्या होत्या. त्यांच्यात आणि वेटरमध्ये काही कारणामुळे बाचाबाची झाली. या महिला जरा जास्तच नको ते बोलायला लागल्या. एक महिला म्हणाली की, 'मी तुमचा केक का खाऊ?'.
महिलांच्या गैरवर्तनाला कंटाळलेल्या वेटरला हे सहन झालं नाही आणि त्याने मागेपुढे न पाहता केक महिलेच्या तोंडावर मारला. जेव्हा दुसरी महिला काही बोलायला लागली तेव्हा दुसऱ्या एका वेटरने तिलाही केक फेकून मारला. रिपोर्ट्सनुसार, दोन्ही महिला फार रागिट होत्या. त्यांना कसं बोलावं याचीही जाणीव नव्हती. अशात वेटरने तेच केलं जे त्यांना योग्य वाटलं.