मुलाला 'ही' वस्तू घेऊन देण्यासाठी अनेक वर्षांपासून जमा केला वडिलाने एक-एक रूपया, फोटो व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 14:27 IST2019-09-09T14:24:18+5:302019-09-09T14:27:45+5:30
सध्या सोशल मीडियात एक वेगळा फोटो व्हायरल होत असून हा फोटो Philippine Trends And News ने शेअर केला आहे.

मुलाला 'ही' वस्तू घेऊन देण्यासाठी अनेक वर्षांपासून जमा केला वडिलाने एक-एक रूपया, फोटो व्हायरल...
सध्या सोशल मीडियात एक वेगळा फोटो व्हायरल होत असून हा फोटो Philippine Trends And News ने शेअर केला आहे. मनाला चटका लावून जाणाऱ्या या फोटोत एक वृद्ध व्यक्ती आणि त्याचा मुलगा दिसत आहे. याबाबत असा दावा केला जात आहे की, या फोटोत दिसणारी वृद्ध व्यक्ती मुलाला नवीन शूज घेता यावे म्हणून अनेक दिवसांपासून एक-एक पैसा जमा करत होती. हा फोटो एका स्टोरमधील असून ही व्यक्ती मुलासोबत शूज घेण्यासाठी गेली होती.
हा फोटो Philippine Trends And News ने २ सप्टेंबरला शेअर केला होता. त्यांनी या फोटोला कॅप्शन दिलं होतं की, 'मित्रांनो, चला या वडिलाला प्रसिद्ध करू. या व्यक्तीने मुलाला नवीन शूज घेऊन देण्यासाठी काही वर्षांपासून थोडे थोडे पैसे जमा केले. तुम्ही त्यांना स्टोरच्या काउंटरवर नाणी मोजताना पाहू शकता. आपण या वडिलाला सलाम केला पाहिजे'.
आतापर्यंत Philippine Trends And News ची हे पोस्ट २६८ लोकांनी शेअर केली आणि १ हजारपेक्षा अधिक लोकांनी लाइक्स केली. अनेकजण या वडिलाचं भरभरून कौतुक करत आहेत.