Farooq Abdullah dance with Amrinder Singh people remember Mirzapur wale chacha | ओ चचा! फारूख अब्दुल्लांचा लग्नातील डान्स व्हिडीओ व्हायरल, लोकांना आली मिर्झापूरमधील 'चचा'ची आठवण!

ओ चचा! फारूख अब्दुल्लांचा लग्नातील डान्स व्हिडीओ व्हायरल, लोकांना आली मिर्झापूरमधील 'चचा'ची आठवण!

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत दोन्ही नेते 'आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे' सुपरहिट गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे. दोन्ही नेत्यांचा हा वेगळा अंदाज पहिल्यांदाच लोकांसमोर आला आहे. 

हा व्हिडीओ पंजाबचे मुख्यमंत्र्यांच्या नातीच्या लग्नातील आहे. लग्नाचं फंक्शन चंडीगढ येथील मुख्यमंत्र्यांच्या फार्म हाऊसवर झालं. यावेळी अनेक मोठे नेतेही उपस्थित होते. दोन्ही नेत्यांच्या डान्सचा व्हिडीओ कॉंग्रेस नेता सरल पटेल यांनी शेअर केलाय. व्हिडीओ पोस्ट करताना त्यांनी कॅप्शन दिलं की, 'वय ही केवळ एक संख्या आहे'.

रिपोर्टनुसार, मुख्यमंत्र्यांच्या नातीचं लग्न दिल्लीतील बिझनेसमन आदित्य नारंग यांच्यासोबत झालं. अशात दोन्ही नेत्यांच्या या व्हिडीओने सर्वांची मनं जिंकली आहेत. 

फारूख अब्दुल्ला यांचा हा डान्स व्हिडीओ पाहून सोशल मीडिया यूजर्सना मिर्झापूर वेबसीरीजमधील 'चचा'ची आठवण झाली. लोकांनी या डान्स व्हिडीओवर काय प्रतिक्रिया दिल्या त्या खाली बघता येतील.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Farooq Abdullah dance with Amrinder Singh people remember Mirzapur wale chacha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.