Faridabad Boy Video Viral: बापरे! आईने मुलाला साडीला बांधून इमारतीच्या दहाव्या मजल्यावर लटकवले; कारण पाहून हादराल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 22:55 IST2022-02-10T22:55:19+5:302022-02-10T22:55:44+5:30
व्हायरल झालेला व्हिडिओ फरिदाबादच्या सेक्टर-82 येथील फ्लोरिडा सोसायटीचा आहे. आजतकच्या टीमने या महिलेला गाठून या प्रकाराबाबत विचारले. तिने सांगितलेले कारण ऐकून सर्वांना धक्काच बसला.

Faridabad Boy Video Viral: बापरे! आईने मुलाला साडीला बांधून इमारतीच्या दहाव्या मजल्यावर लटकवले; कारण पाहून हादराल
दिल्लीला लागूनच असलेल्या फरीदाबादमध्ये धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही हादराल एवढे नक्की. एक आई असे आपल्या मुलासोबत करू शकते का? त्या महिलेने मुलाला साडीला बांधून दहाव्या मजल्यावरच्या गॅलरीतून खाली टांगले होते. साडीची गाठ थोडीजरी ढीली झाली असती तर तो मुलगा जमिनीवर आदळला असता आणि ठार झाला असता. परंतू तसे काही झाले नाही, त्या मुलाला वरती सुखरुप घेण्यात आले.
व्हायरल झालेला व्हिडिओ फरिदाबादच्या सेक्टर-82 येथील फ्लोरिडा सोसायटीचा आहे. आजतकच्या टीमने या महिलेला गाठून या प्रकाराबाबत विचारले. तिने सांगितलेले कारण ऐकून सर्वांना धक्काच बसला. नवव्या फ्लोअरच्या बाल्कनीमध्ये त्या महिलेचे कपडे पडले होते. त्या घराला टाळे असल्याने ती खाली जाऊन ते आणू शकत नव्हती. म्हणून तिने तिच्या मुलाला साडीला बांधले आणि खाली सोडले. समोरच्या इमारतीत राहणाऱ्यांनी हा प्रकार आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केला. हा व्हिडीओ आता सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
या महिलेला आता तिने केलेल्या या अजब प्रकाराचा पश्चात्ताप होत आहे. ही घटना सहा किंवा सात फेब्रुवारीची आहे. सध्या या महिलेला सोसायटीने हे कृत्य केल्याने नोटीस पाठविली आहे.