तुम्ही बाजारातून नकली मिनरल वॉटर तर घेत नाही ना? वेळीच व्हा सावध...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 15:34 IST2024-04-11T15:34:02+5:302024-04-11T15:34:10+5:30
अनेक लोक भंगारातून या बॉटल्स विकत घेऊन त्यात साधं पाणी भरतात आणि सील करून विकतात.

तुम्ही बाजारातून नकली मिनरल वॉटर तर घेत नाही ना? वेळीच व्हा सावध...
भारतात वेगवेगळ्या भागात सध्या उन्हाचा चांगलाच तडाखा बघायला मिळत आहे. अनेक ठिकाणी तापमान 40 च्या वर गेलं आहे. अशात जसं तापमान वाढतं पाण्याची समस्या सुरू होते. उन्हामुळे नदी, तलाव कोरडे पडू लागतात. बोरिंगच्या पाण्याची लेव्हलही खाली जाते. अशात बरेच लोक बाजारात मिळणारं मिनरल्स वॉटर खरेदी करून आपली तहान भागवतात.
अशात उन्हाळ्यात अनेकदा नकली मिनरल्स वॉटरच्या बॉटलचा धंदा तेजीत असतो. अनेक लोक भंगारातून या बॉटल्स विकत घेऊन त्यात साधं पाणी भरतात आणि सील करून विकतात. लोकांना वाटतं की, ते ओरिजनल मिनरल वॉटर खरेदी करत आहेत. पण हे पाणी तुम्ही तुमचं आरोग्य धोक्यात टाकत असता.
बाजारातून पाणी विकत घेणारे लोक फक्त बॉटलचं सील चेक करतात. पण अनेकांना हे माहीत नाही की, बाजार अशीही मशीन आली आहे ज्याद्वारे बॉटलचं झाकणं सील करता येतं. याव्दारे जुन्या बॉटल सील केल्या जातात. याने नव्या बॉटलसारखं सील लावता येतं.
सामान्यपणे मिनरल वॉटर प्रॉसेस केलं जातं. आरोग्यासाठी हे पाणी नुकसानकारक असतं. पण लोक जुन्या बॉटलमध्ये पाणी असं सील पॅक करतात आणि मिनरल वॉटर इतके पैसे घेतात. सोशल मीडियावर बॉटल सील करणाऱ्या मशीनचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.