शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

व्हायरल सत्य! स्वामी असिमानंदांची निर्दोष मुक्तता करणारे न्यायाधीश खरंच भाजपामध्ये झाले सामील?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 17:00 IST

या भीषण बॉम्बस्फोटात सहभागी असल्याचा आरोप स्वामी असिमानंद यांच्यावर करण्यात आला होता.

नवी दिल्ली- 18 मे 2007 या दिवशी हैदराबादच्या मक्का मशिदीत भीषण बॉम्बस्फोट घडवून त्यात नऊ निरपराधांचे बळी गेले होते. या भीषण बॉम्बस्फोटात सहभागी असल्याचा आरोप स्वामी असिमानंद यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर न्यायमूर्ती रवींद्र रेड्डी यांनी त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. आता तेच न्यायाधीश रवींद्र रेड्डी भाजपामध्ये सहभागी झाल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर अशा प्रकारचा एक फोटो व्हायरल झाला आहे.त्या फोटोमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्याबरोबरच भगवी वस्त्रे परिधान केलेली आणखी एक व्यक्ती दिसत आहे. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून मक्का मशिदीत भीषण बॉम्बस्फोट प्रकरणावर निकाल देणारे न्यायाधीश रवींद्र रेड्डी असल्याची चर्चा आहे. परंतु त्याची पडताळणी केली असता ते खोटं असल्याचं समोर आलं आहे.  भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्याबरोबर फोटोमध्ये दिसत असलेली व्यक्ती छत्तीसगड काँग्रेसचे माजी नेते रामदयाल उइके आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. मंगलोर व्हाइस या फेसबुक पेजवर ही पोस्ट टाकण्यात आली असून, त्यासंदर्भात त्यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे.