शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

व्हायरल सत्य! चीननं 2012मध्ये खरंच भारताचा हवामान उपग्रह पाडला होता?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2019 6:14 PM

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिशन शक्तीची घोषणा केल्यानंतर त्याची फार चर्चा झाली.

नवी दिल्ली- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीमिशन शक्तीची घोषणा केल्यानंतर त्याची फार चर्चा झाली. भारतानं 27 मार्चला मिशन शक्तीअंतर्गत उपग्रहरोधक शस्त्र म्हणजेच A-SATच्या माध्यमातून सॅटेलाइटचा वेध घेऊन ते पाडलं होतं. अशा प्रकारे भारताला अवकाश संशोधन क्षेत्रात मोठं यश मिळालं होतं. मिसाइलच्या सहाय्यानं उपग्रह पाडणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा देश ठरला. परंतु यासंदर्भात काही पोस्टही व्हायरल झाल्या आहेत.चीननं 2012मध्ये भारताचा हवामान उपग्रह पाडल्याच्या पोस्टही प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु याची पडताळणी केली असता, ते सर्व खोटं असल्याचं समोर आलं आहे. फेसबुकवर अमित शाह फॅन्स नावाचं पेज आहे. या पेजचे 612163 फॉलोअर्स आहेत. या पेजवर 1 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोटोबरोबर एक दावा केला होता. 2012मध्ये चीननं भारताचा एक हवामान उपग्रह पाडला होता आणि आता भारतानं मिशन शक्ती केल्यानंतर शांत राहण्याचं आवाहन करत आहे. मोदींमुळेच हे शक्य झालं, असंही या पोस्टमध्ये लिहिलं आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या असून, 130हून अधिक लोकांनी मोदींवर स्तुतिसुमनं उधळली होती. 2012मध्ये चीननं एक उपग्रह पाडला होता, परंतु तो भारताचा नव्हता, असंही उघड झालं आहे.

चीन 2007पासून उपग्रहरोधक क्षेपणास्त्राची चाचणी घेत होता. त्यासाठी त्यांनी स्वतःचा निष्क्रिय झालेला उपग्रह पाडला होता. त्या उपग्रहाचं नाव फेंग्युन 1सी होतं. त्यावेळी नासाच्या संशोधकांनी त्यावर चिंता व्यक्त केली होती. जर चीननं खरंच भारताचा उपग्रह पाडला होता, तर त्याची चर्चा का नाही झाली. या बातमीचा कोठेही उल्लेख नाही. असं काही झालं असतं तर भारत सरकारनं याचा विरोध नक्कीच केला असता. त्या वृत्ताची कुठेही खातरजमा होत नसून ती अफवा असल्याची चर्चा आहे. 2012मध्ये चीननं भारताचा कोणताही उपग्रह पाडलेला नव्हता.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीchinaचीनMission Shaktiमिशन शक्ती