प्रसिद्ध कंपनीने लॉन्च केली भाजीसारखी दिसणारी बॅग, किंमत इतकी की घेऊ शकाल लक्झरी कार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 13:30 IST2024-11-08T13:29:55+5:302024-11-08T13:30:35+5:30
Moschino Celery Bag: डिझाईन तर अजब आहेच, पण या बॅगच्या किंमतीने लोकांची झोप उडाली आहे. कारण या बॅगच्या किंमतीत तुम्ही एक लक्झरी कार खरेदी करू शकता.

प्रसिद्ध कंपनीने लॉन्च केली भाजीसारखी दिसणारी बॅग, किंमत इतकी की घेऊ शकाल लक्झरी कार!
Moschino Celery Bag: प्रसिद्ध फॅशन ब्रॅन्ड मोशिनो या वर्षाच्या सुरूवातीलाच एक अनोख्या डिझाईनची बॅग लॉन्च केली होती. ही बॅग ब्रेडसारखी दिसत होती. आता या ब्रॅन्डने पुन्हा एक अजब डिझाईनची बॅग लॉन्च केली आहे. जी सेलेरी भाजीसारखी दिसते. डिझाईन तर अजब आहेच, पण या बॅगच्या किंमतीने लोकांची झोप उडाली आहे. कारण या बॅगच्या किंमतीत तुम्ही एक लक्झरी कार खरेदी करू शकता.
सोशल मीडियावर सध्या या ब्रॅन्डच्या नव्या बॅगची चर्चा रंगली आहे. ही बॅग तयार करण्यासाठी दोन रंगाच्या शेड्सच्या लेदरचा वापर करण्यात आला आहे. काही लोक या बॅगला पसंती देत आहेत तर काही लोक ही बॅग बघून हैराण झाले आहेत.
फॅशनच्या विश्वात रोज काहीतरी नवीन होत असतं. पण यावेळी मोस्किनोने सगळ्यांनाच अवाक् केलं. यावेळी त्यांनी एक अशी बॅग लॉन्च केली जी एखाद्या भाजीसारखी किंवा एखाद्या रोपासारखी दिसते. त्याहून महत्वाची बाब म्हणजे या बॅगची किंमत $4,470 म्हणजेच जवळपास ४ लाख रूपये ठेवली आहे.
मोस्किनोने ही बॅग क्लचच्या रूपात सादर केली आहे आणि दोन हिरव्या रंगात तयार केली आहे. बॅगमधील पाने आणि फांद्या नप्पा लेदरपासून तयार केले आहेत.
सोशल मीडिया यूजर्स या बॅगबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने गंमतीने लिहिलं की, "आई : कोथिंबीर कुठे आहे? मी : कोथिंबिरीच्या बॅगमध्ये". मोस्किनो हा ब्रॅन्ड पहिल्यांदाच काय अशा अजब डिझाईनमुळे चर्चेत आला नाही. याआधी त्यांनी अनेक वस्तू अजब डिझाईनमध्ये सादर केल्या आहेत.