दर मिनिटाला १ रूपया पाठवत आहे एक्स बॉयफ्रेन्ड, तरूणीने सांगितला ब्रेकअपनंतरचा किस्सा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 14:54 IST2024-11-22T14:53:49+5:302024-11-22T14:54:22+5:30
काही लोक असे असतात जे भूतकाळ विसरून जीवनात पुढे जातात. पण काही लोक मात्र या वेदनेतून बाहेर पडत नाही.

दर मिनिटाला १ रूपया पाठवत आहे एक्स बॉयफ्रेन्ड, तरूणीने सांगितला ब्रेकअपनंतरचा किस्सा!
बरीच वर्ष एखाद्या व्यक्तीसोबत नात्यात असणं आणि अचानक ते नातं तुटणं हा खूप वेदना देणारा काळ असतो. काही लोक असे असतात जे भूतकाळ विसरून जीवनात पुढे जातात. पण काही लोक मात्र या वेदनेतून बाहेर पडत नाही.
पार्टनरने नातं संपवल्यावर दुसरा काही पिच्छा सोडायला तयार नसतो. यामुळे तणाव आणि स्ट्रेस येतो. सोशल मीडियावर अशा अनेक घटना व्हायरल होत असतात. ज्यात ब्रेकअपनंतर एक्स पार्टनर पिच्छा सोडत नाही किंवा कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्रास देत असतो.
सोशल मीडियावर एका महिलेची पोस्ट व्हायरल झाली आहे. ज्यात तिने तिच्या एक्सच्या कारनाम्याबाबत सांगितलं आहे. महिलेने सांगितलं की, तिने तिच्या एक्सला सगळ्या ठिकाणांहून ब्लॉक केलं आहे. पण तो तिला ऑनलाइन पेमेंट अॅप्सच्या माध्यमातून दर मिनिटाला १-१ रूपया पाठवून त्रास देत आहे. ज्यामुळे ती सध्या मानसिक तणावात आहे.
सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाली आहे. तर या पोस्टवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियाही येत आहेत. एका यूजरने लिहिलं की, त्याला ब्लॉक करू नको, फुकट पैसे कमावत आहे. तर दुसऱ्याने लिहिलं की, 'जर त्याने वर्षभर असं केलं तर तुझ्याकडे ५१८४०० रूपये जमा होतील'.