बॉस असावा तर असा! सलग तिसऱ्या वर्षी दिवाळीला कर्मचाऱ्यांना गिफ्ट केल्या ५१ आलिशान कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 15:28 IST2025-10-20T15:27:46+5:302025-10-20T15:28:35+5:30
दिवाळीपूर्वी सोशल मीडियावर त्यांचे "कार गिफ्टिंग" रील्स ट्रेंड होत आहेत. या वर्षी भाटिया यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना आलिशान गाड्या भेट देऊन आश्चर्याचा मोठा धक्का दिला.

बॉस असावा तर असा! सलग तिसऱ्या वर्षी दिवाळीला कर्मचाऱ्यांना गिफ्ट केल्या ५१ आलिशान कार
चंदीगडमधील उद्योजक एम.के. भाटिया पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दिवाळीपूर्वी सोशल मीडियावर त्यांचे "कार गिफ्टिंग" रील्स ट्रेंड होत आहेत. या वर्षी भाटिया यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना आलिशान गाड्या भेट देऊन आश्चर्याचा मोठा धक्का दिला. सलग तिसरं वर्ष आहे जेव्हा त्यांनी त्यांच्या टीमला कार भेट दिल्या आहेत. या कार रँक आणि कामगिरीच्या आधारे देण्यात आल्या.
भाटिया यांनी यावेळी एकूण ५१ कार वाटून आपली परंपरा एका नवीन उंचीवर नेली. जेव्हा त्यांच्या कर्मचाऱ्यांना शोरूममधून नवीन कारच्या चाव्या मिळाल्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसून आला. त्यानंतर त्यांनी "कार गिफ्ट रॅली" आयोजित केली ज्याने संपूर्ण शहराचं लक्ष वेधून घेतलं. सजवलेल्या कारचा ताफा रस्त्यावरून जात असताना लोकांनी त्यांचे फोन काढले आणि व्हिडिओ काढायला सुरुवात केली.
एम.के. भाटिया यांनी म्हटलं की, माझे कर्मचारी माझ्या फार्मा कंपन्यांची खरी ताकद आहेत. त्यांचे कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणा ही आमच्या यशामागील प्रेरक शक्ती आहे. त्यांचा सन्मान करणं आणि त्यांना प्रेरित करणं हे माझं कर्तव्य आहे. ही केवळ भेटवस्तू नाही, तर टीमला प्रेरणा देण्याचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. भाटिया हे दीर्घकाळापासून फार्मा सेक्टरशी संबंधित आहेत. २०१५ मध्ये त्यांनी स्वतःची औषध कंपनी सुरू केली. त्यांना यश मिळालं आणि आज ते १२ कंपन्या चालवतात.
सोशल मीडियावर कार गिफ्ट रील्स येताच त्या व्हायरल झाल्या. अनेक युजर्सनी यावर कमेंट केल्या आहेत. "प्रत्येकाला असा बॉस मिळावा" असं म्हटलं आहे. भाटिया यांच्या या उपक्रमाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना केवळ आनंद दिला नाही तर समाजात सकारात्मक नेतृत्वाचे उदाहरणही ठेवलं. एम.के. भाटिया यांनी दाखवून दिलं आहे की, यश केवळ पैसे कमवण्यात नाही तर आनंद आणि कृतज्ञता वाटण्यात आहे.