ऑफिसच्या नावावर आयुष्य केले, ना प्रमोशन मिळाले, ना कौतुक झालं; राजीनामा देताच कंपनीला बसला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 14:20 IST2026-03-08T14:19:56+5:302026-03-08T14:20:15+5:30

ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मेहनतीने आपले काम होते परंतु जेव्हा तुम्ही दिसता तेव्हाच तुम्हाला संधी मिळते असं एका युजरने त्यावर लिहिले आहे.

Employee resigns from job after 11 years, company realizes his work, post goes viral on social media | ऑफिसच्या नावावर आयुष्य केले, ना प्रमोशन मिळाले, ना कौतुक झालं; राजीनामा देताच कंपनीला बसला फटका

ऑफिसच्या नावावर आयुष्य केले, ना प्रमोशन मिळाले, ना कौतुक झालं; राजीनामा देताच कंपनीला बसला फटका

११ वर्षाच्या नोकरीत ६ वर्षापर्यंत कुठलेही प्रमोशन मिळाले नाही. कुणीही त्याच्या कामाचे कौतुक केले नाही. तरीही तो काम करत राहिला. ऑफिसमध्ये त्याच्या कामाचे श्रेय कधी मिळाले नाही. सोबत काम करताना कधीही त्याच्या मेहनतीची जाणीव झाली नाही. मात्र जेव्हा त्याने नोकरीचा राजीनामा दिला तेव्हा त्याच्या कामाची जाणीव ठळकपणे दिसून आली. 

ही पोस्ट एका सोशल मिडिया हँडलवरून करण्यात आली आहे. ज्यात सीनियर कर्मचाऱ्याची चर्चा सुरू झाली आहे. ज्याने आपलं आयुष्य कंपनीच्या नावे केले. तो जाणकार होता आणि कंपनीच्या सिस्टीम इतर कोणापेक्षाही चांगल्या प्रकारे जाणून होता. अर्ध्या रात्रीही काही अडचण आली तर त्याचीच आठवण सगळ्यांना यायची. कधीही कॉल केला तरी तो सहजपणे सगळ्यांना उत्तरे द्यायचा. परंतु कधीही त्याच्या कामाचे श्रेय त्याला मिळाले नाही. याबाबत या कर्मचाऱ्यानेही कुणाकडे तक्रार केली नाही.

जेव्हा कुणी विचारले, तुला वाईट वाटत नाही का...? त्यावर तो मी माझे काम प्रामाणिकपणे करतोय. ज्याने त्याला विचारले त्यानेही २ महिन्यांनी राजीनामा दिला. मग काही दिवसांनी २६ वर्षीय नवीन कर्मचारी ऑफिसला कामाला आला. तोही काही दिवसांत अशा बैठकींचा भाग झाला ज्यात इतर लोकांना कधीही जाण्याची संधी मिळाली नाही. इतकी वर्ष मेहनतीने काम करणाऱ्या या कर्मचाऱ्याने राजीनामा दिला. त्यानंतर  कंपनीला पहिल्यांदाच त्याची आठवण आली. ११ वर्षांत पहिल्यांदाच कंपनीने त्याच्या नावाने ईमेलमध्ये लिहिला आणि टीमचे नुकसान झाल्याचं सांगितले. 

ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मेहनतीने आपले काम होते परंतु जेव्हा तुम्ही दिसता तेव्हाच तुम्हाला संधी मिळते असं एका युजरने त्यावर लिहिले आहे. तर व्हिजिबल आणि व्हॅल्यूबल असण्यात हेच अंतर असते असं दुसऱ्याने म्हटलं आहे.

Web Title : वफ़ादार कर्मचारी का इस्तीफ़ा, सालों बाद कंपनी को हुआ नुक़सान का एहसास।

Web Summary : एक समर्पित कर्मचारी, जिसकी सालों तक सराहना नहीं हुई, उसने इस्तीफ़ा दे दिया। बेहतरीन प्रदर्शन और हमेशा उपलब्ध रहने के बावजूद, उसे कोई पदोन्नति या पहचान नहीं मिली। कंपनी को उसके जाने के बाद ही उसकी अहमियत का एहसास हुआ।

Web Title : Loyal employee's resignation hits company after years of neglect.

Web Summary : A dedicated employee, unappreciated for years, resigned. Despite excelling and being the go-to person, he received no promotions or recognition. The company only acknowledged his value upon his departure, realizing the loss to the team.