कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी कार्यालयं बंद होतं. अत्यावश्यक सेवा सोडल्या तर अनेक जण घरूनच कामही करत होते. परंतु जसजसा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला, तसतशी कार्यालयं पुन्हा सुरूही झाली आणि कर्मचारी हळूहळू आपल्या कार्यालयांमध्ये रूजूही होऊ लगाले. दरम्यान, सध्या एक पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात कर्मचाऱ्यानं चक्क कार्यालयात आपण घोड्यावरून येणार असून घोडा उभा करण्यासाठी जागा मिळावी यासाठी कर्मचाऱ्यानं चक्क जिल्हाधिकारी कार्यालयालाच पत्र लिहिलं आहे.सतीश देशमुख असं या कर्मचाऱ्याचं नाव असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. तसंच सध्या ते सहाय्यक लेखाधिकारी (रोहयो शाखा), जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे कार्यरत आहेत. आपल्याला पाठीचा त्रास होत असल्यामुळे कार्यालयात दुचाकीवरून येण्यास समस्या निर्माण होत असल्याचं त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.
घोड्यावरून ऑफिसला यायचं ठरवलंय, तो बांधायला परवानगी द्यावी; नांदेडच्या कर्मचाऱ्याचं पत्र व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 15:33 IST
कर्मचाऱ्यांनं जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं पत्र
घोड्यावरून ऑफिसला यायचं ठरवलंय, तो बांधायला परवानगी द्यावी; नांदेडच्या कर्मचाऱ्याचं पत्र व्हायरल
ठळक मुद्देकर्मचाऱ्यांनं जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं पत्रघोडा विकत घेण्याचा आपण निर्णय घेतल्याचा कर्मचाऱ्याचा पत्रात उल्लेख