Video : देव तारी त्याला कोण मारी! चालता चालता ट्रकखाली सापडल्या आजी; अन् असा झाला चमत्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 19:51 IST2020-12-07T17:14:33+5:302020-12-07T19:51:42+5:30
Trending Viral News in Marathi: ही वयस्कर महिला चालत असताना एक पिवळ्या रंगाचा ट्रक आला या आजींना खेचून नेलं.

Video : देव तारी त्याला कोण मारी! चालता चालता ट्रकखाली सापडल्या आजी; अन् असा झाला चमत्कार
दक्षिण भारतातील एका शहरात रस्त्यावर चालत असलेल्या आजींच्या अंगावरून ट्रक गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चमत्कार म्हणजे इतक्या मोठ्या दुर्घटनेच सापडूनही या आजी सुखरूप वाचल्या आहेत. त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. रिपोर्ट्नुसार ही घटना तामिळनाडूतील तिरूचेंगोडे येथील आहे. ही वयस्कर महिला चालत असताना एक पिवळ्या रंगाचा ट्रक आला या आजींना खेचून नेलं.
Elderly #Indian woman run over by truck miraculously escapes unscathed pic.twitter.com/AFGq2uYf3e
— CGTN (@CGTNOfficial) December 6, 2020
हा व्हिडीओ ट्विटरवर CGTN कडून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला १९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं असून १४१ पेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओ मिळाले आहेत. सीजीटीएनच्या रिपोर्टनुसार ट्रक चालक जेव्हा टर्न घेत होता तेव्हा या आजींचे लक्ष नसल्यामुळे असं घडलं असावं.भारीच! नवरीची डासू एंट्री पाहून नवऱ्याने नजरच काढली ना राव; पाहा जबरदस्त एंट्रीचा व्हिडीओ
५४ सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता गुलाबी साडी नेसलेल्या या आजी रस्त्यावर चालत आहेत. अचानक पिवळ्या रंगाचा ट्रक येतो आणि या आजींना खेचून नेतो. ट्रक निघून जातो, मग काहीवेळानंतर स्वतःहून या आजी उठून उभ्या राहतात. आजूबाजूला उपस्थित असलेले लोक या आजींच्या मदतीला धावून जातात. काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओतून दिसून येतं की, वयस्कर लोकांनी घराबाहेर पडल्यानंतर विशेष काळजी घ्यायला हवी. Video : पाठवणीनंतर रड रड रडली अन् निघाला मेकअप; खरं रूप दिसताच नवऱ्यानं केलं असं काही