आपोआप स्टार्ट झाली ई-रिक्षा अन् रस्त्यावर धावली, पकडण्यासाठी मागे धावत गेला मालक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 14:36 IST2025-01-18T14:35:17+5:302025-01-18T14:36:03+5:30

E-rickshaw Viral Video: सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक ई-रिक्षा आपोआप रस्त्यात चालत असल्याचं बघायला मिळालं. 

E rickshaw starts itself and runs on the road users shocked watch viral video | आपोआप स्टार्ट झाली ई-रिक्षा अन् रस्त्यावर धावली, पकडण्यासाठी मागे धावत गेला मालक...

आपोआप स्टार्ट झाली ई-रिक्षा अन् रस्त्यावर धावली, पकडण्यासाठी मागे धावत गेला मालक...

E-rickshaw Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच अनेक मजेदार व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. कधी ते पोटधरून हसवणारे तर कधी अवाक् करणारे असतात. अनेकदा तर काही व्हिडिओंमध्ये असं काही बघायला मिळतं, ज्यावर सहजपणे विश्वासही बसत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक ई-रिक्षा आपोआप रस्त्यात चालत असल्याचं बघायला मिळालं. 

व्हायरल झालेला हा व्हिडीओ जयपूरच्या जल महालासमोरील आहे. ज्यात तुम्ही बघू शकता की, पावसात एक ई-रिक्षा उभी आहे. ही रिक्षा आपोआपा सुरू होते आणि रस्त्यावर धावू लागते. काही वेळात ई-रिक्षाचा मालक त्याला पकडण्यासाठी मागू धावत जातो. आश्चर्यकारक बाब म्हणजे रिक्षाचं हॅंडलही आपोआप टर्न होत आहे.

हा व्हिडीओ बघून लोक अवाक् झाले आहेत आणि त्यांना अनेक प्रश्नही पडले आहेत.
एका यूजरनं लिहिलं की, 'पावसामुळे ई-रिक्षातील इंटरनल वायर कनेक्ट झाले असतील आणि त्यामुळे सुरू झाला'. दुसऱ्यानं लिहिलं की, 'पावसाळ्यात बॅटरी रिक्षाचे जे रस तार असतात, त्यात पाणी गेल्यानं रिक्षा स्टार्ट होतो'. अनेक लोकांनी ई-रिक्षा ऑटोमॅटिक स्टार्ट होण्याचं कारण सांगितलं आहे. 

Web Title: E rickshaw starts itself and runs on the road users shocked watch viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.