शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीने हिरावला तोंडचा घास; मातीमोल झालेलं पीक पाहून शेतकऱ्याला अश्रू अनावर, Video पाहा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 13:47 IST

सध्या सोशल मीडियावर एका शेतकऱ्याच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतंलय.

Social Viral : पावसामुळे काढणीला आलेल्या कांद्याचं पीक पाण्याखाली गेलेलं पाहताच या शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले. त्याचा मन हेलावून टाकणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

शेतकरी टिकला तर देश टिकेल असं आपण म्हणतो. अनेकदा जय जवान जय किसानचे नारे लावले जातात. पण, प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे प्रश्न कायमचे डावळले जातात. अवकाळी पावसाने नुकसान झालं तर शेतकऱ्यांना केवळ प्रशासनाचा आधार असतो. सरकारी मदत केव्हा मिळेल याची चातकाप्रमाणे तो वाट पाहत असतो. पण त्याच्या नशीबी कायमच निराशा येते. 

अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होऊन शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास नियतिने हिसकावून घेतलाय. या अवकाळी पावसामुळे शेतीचं झालेलं नुकसान पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे. याचा प्रत्यय हा व्हायरल व्हिडिओ पाहून येईल. या शेतकऱ्याचं ओक्साबोक्शी रडणं पाहून काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. नशीबाला दोष देत हा शेतकरी धाय मोकळून रडतोय. माय-बाप शेतकऱ्याच्या कोणी वाली आहे की नाही? असा सवाल सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला जात आहे.

insta_king_mh42 नावाच्या या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. जवळपास ५० हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिलाय. ''शेतकऱ्यांचे दु:ख समजणारा एकही नेता नाही'', तसंच ''खचू जाऊ नका धीर धरा'' अशा प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी या व्हिडिओओवर दिल्याच्या पाहायला मिळत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाFarmerशेतकरीRainपाऊस