VIDEO: बारमध्ये मद्यपींमध्ये झाला राडा अन् नंतर जे घडलं ते हादरवणारं ठरलं, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 09:47 IST2022-06-25T09:46:17+5:302022-06-25T09:47:12+5:30

मद्यपी व्यक्तींची भीती तेव्हा वाटू लागते जेव्हा ते आपापसांत लढू लागतात. मग त्यांना रोखणं खूप कठीण असतं आणि भांडण कोणत्याही थराला जाऊ शकतं.

Drunk People Group Fight Video Goes Viral watch here | VIDEO: बारमध्ये मद्यपींमध्ये झाला राडा अन् नंतर जे घडलं ते हादरवणारं ठरलं, पाहा...

VIDEO: बारमध्ये मद्यपींमध्ये झाला राडा अन् नंतर जे घडलं ते हादरवणारं ठरलं, पाहा...

मद्यपी व्यक्तींची भीती तेव्हा वाटू लागते जेव्हा ते आपापसांत लढू लागतात. मग त्यांना रोखणं खूप कठीण असतं आणि भांडण कोणत्याही थराला जाऊ शकतं. असंच एक प्रकरण समोर आलं आहे जिथं मद्यपींना घातलेला राडा पाहून सर्वच हादरले आहेत. मद्यपींचा राडा सुरू असताना तर कुणीही त्यात हस्तक्षेप करण्याची हिंमतही केली नाही. एका रेस्टॉरंट आणि बारमध्ये काही मद्यपींमध्ये वाद झाला. वादाचं रुपांतर हाणामारीत झालं आणि रेस्टॉरंटला खूप मोठं नुकसान सहन करावं लागलं. 

संबंधित घटना भारतातील नसली तरी त्यांचं गांभीर्य लक्ष वेधणारं नक्कीच आहे. मद्यपींच्या राड्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत असून हा व्हिडिओ पोर्तुगालमधील असल्याचं सांगितलं जात आहे. काही मद्यपींनी एका रेस्टॉरंट आणि बारबाहेर तुफान राडा घातल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं. मद्यपींनी रेस्टॉरंटच्याच खुर्च्या, टेबल फेकून हॉटेलचं नुकसान केलं. 

राड्याचं कारण काय?
मद्यपींच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याचं एका ट्विटमध्ये सांगण्यात आलं आहे. बारचा मॅनेजर जेव्हा मद्यपींना समजावायला गेला तेव्हा लोक त्याच्यावर चिडले आणि त्यांनी बार मॅनेजरला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर खुर्च्या, टेबल फेकून हॉटेलचं नुकसान केलं. याप्रकरणी 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेकांना दुखापतही झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

Web Title: Drunk People Group Fight Video Goes Viral watch here