दारूच्या नशेत 'तो' फणा काढलेल्या सापासोबत खेळू लागला, थरारक व्हिडीओ झाला व्हायरल....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 11:30 IST2020-01-06T11:29:46+5:302020-01-06T11:30:08+5:30

दारूची नशा माणसाला कशी नाचायला लावते हे सर्वांनाच माहीत आहे. पण त्या व्यक्तीला मात्र हे माहीत नसतं. एका दारूड्याचा एक थरारक कारनामा समोर आला आहे.

Drunk man playing for hours with snake video goes viral | दारूच्या नशेत 'तो' फणा काढलेल्या सापासोबत खेळू लागला, थरारक व्हिडीओ झाला व्हायरल....

दारूच्या नशेत 'तो' फणा काढलेल्या सापासोबत खेळू लागला, थरारक व्हिडीओ झाला व्हायरल....

दारूची नशा माणसाला कशी नाचायला लावते हे सर्वांनाच माहीत आहे. पण त्या व्यक्तीला मात्र हे माहीत नसतं. एका दारूड्याचा एक थरारक कारनामा समोर आला आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून हसून हसून लोटपोट व्हाल. राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील ही घटना आहे. येथील गुढाकटला गावात एक व्यक्ती दारूच्या नशेत फणा काढलेल्या सापासोबत खेळत होता. इतकेच नाही तर त्याने सापाला पकडले देखील.

साधारण अर्धा तास दारोड्या व्यक्ती सापाला पकडत होता. सापाने त्याला ठिकठिकाणी चावला सुद्धा. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, तो सापासमोर झोपतो. त्याला जाऊ देत नाही. कधी साप हातात घेतो तर कधी मानेला गुंडाळतो. कधी आशीर्वाद घेतो तर कधी आणखी काही. बराच वेळ दोघांचा हा ड्रामा सुरू राहतो.

झालं असं की, सापाने चावल्याने या व्यक्तीचं संपूर्ण शरीर निळं पडलं आहे. गावातील काही लोकांनी त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केलं. या व्यक्तीचं नाव प्रकाश महावर असून त्याची स्थिती कशी आहे हे अजून समजू शकले नाही.


Web Title: Drunk man playing for hours with snake video goes viral