Video - ऑनलाईन ऑर्डर केलं फूड; डिलिव्हरी बॉयची अवस्था पाहून डोकंच फिरेल, दारू पिऊन...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 19:31 IST2025-10-16T19:30:40+5:302025-10-16T19:31:24+5:30
एका ग्राहकाला धक्कादायक अनुभव आला आहे. सोशल मीडियावर डिलिव्हरी बॉयचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

Video - ऑनलाईन ऑर्डर केलं फूड; डिलिव्हरी बॉयची अवस्था पाहून डोकंच फिरेल, दारू पिऊन...
आजकाल बरेच लोक ऑनलाईन फूड डिलिव्हरी एप्सवरून ऑर्डर केलेली ऑर्डर उशिरा येत असल्याची तक्रार करतात. डिलिव्हरीची वेळ वेगळी असते आणि डिलिव्हरी बॉय इतका उशिरा येतो की ऑर्डर केलेलं जेवण थंड होऊन जातं.
एका ग्राहकाला असाच धक्कादायक अनुभव आला आहे. सोशल मीडियावर डिलिव्हरी बॉयचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. डिलिव्हरी करणारा माणूस दारू पिऊन आला होता आणि त्याने ऑर्डर खूप उशिरा आणली असं ग्राहकाने म्हटलं आहे.
व्हिडिओमध्ये एक ग्राहक डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ काढताना दिसत आहे आणि म्हणतो, "मी खूप आधी फूड ऑर्डर केलं होतं आणि ते आता खूप उशिरा आणलं आहे. डिलिव्हरी बॉयने त्याच्या एपवर फूड आधीच डिलिव्हर केल्याचं एंटर केलं होतं, परंतु ते आता खूप उशिरा आलं आहे."
Kalesh b/w Delivery guy and Customer (Full-Context in the clip) pic.twitter.com/TYVtPTWpmM
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 15, 2025
ग्राहकाने डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्ती ड्युटीवर असताना दारू पिऊन आल्याचा, नशेत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यामुळे ऑर्डरला आणखी उशीर झाला. याशिवाय, पार्सल बॉक्सही अनेक ठिकाणी दबले गेले होते. यावरून दोघांमध्ये बराच वाद होतो.
डिलिव्हरी बॉय यानंतर त्याच्या कंपनीला फोन करतो आणि या संपूर्ण प्रकरणाची माहिती देतो. थोड्याशा वादानंतर, तो रागावून त्याच्या बाईकवरून निघून जातो. ग्राहकाने दाखवलं की, डिलिव्हरी करणारा माणूस ला-पिनोज पिझ्झाचा आहे. @gharkekalesh नावाच्या पेजने शेअर केलेला हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ आतापर्यंत ३१,००० हून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओवर लोकांनीही कमेंट केल्या आहेत. काहींनी डिलिव्हरी करणाऱ्या माणसांबद्दल अशाच तक्रारी केल्या आहेत, तर काहींनी मजेदार कमेंट केल्या आहेत. सध्या याची चर्चा रंगली आहे.