"काय झाडी, काय डोंगार..." पाहत ती चालवत होती गाडी, अचानक साईड मिरर मधून बाहेर आला साप अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 23:27 IST2022-07-13T23:27:23+5:302022-07-13T23:27:57+5:30
Social Viral : भटकंतीची आवड सर्वांनाच खुणावते. अनेकांच्या वाट्याला या भटकंती दरम्यान काही थरकाप उडवून देणारे किंवा आयुष्यभर लक्षात राहावे असे अनुभव येतात.

"काय झाडी, काय डोंगार..." पाहत ती चालवत होती गाडी, अचानक साईड मिरर मधून बाहेर आला साप अन्...
महाराष्ट्रातील राजकारणात सध्या काय झाडी, काय डोंगार... याने हवा केली आहे. पावसाच्या दमदार एन्ट्रीमुळे निसर्गानेही हिरवी शाल परिधान केल्याचे दिसत आहे. अशात महाराष्ट्रच राहुन काय झाडी, काय डोंगार... पाहायला मिळत आहे. भटकंतीची आवड सर्वांनाच खुणावते. अनेकांच्या वाट्याला या भटकंती दरम्यान काही थरकाप उडवून देणारे किंवा आयुष्यभर लक्षात राहावे असे अनुभव येतात. असाच अनुभव एका तरुणीला आला आहे आणि न्यू यॉर्क पोस्टने प्रसिद्ध केलेल्या बातमीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
विकी रूह ( Vicki Ruhl ) हिच्या वाट्याला थरकाप उडवणारा अनुभव आला आहे. अमेरिकेतील विंटर पार्क येथील हा प्रसंग आहे. विकी ताशी ७०च्या वेगाने हाय वे वर कार चालवत होती. गाडी चालवताना आजूबाजूला दिसणारा निसर्ग ती डोळ्यांत साठवत होती. पण, अचानक तिच्या गाडीच्या साईड मिररमधून साप बाहेर आला अन् तिच्या गाडीच्या काचेवर चिटकला. अचानक समोर साप दिसताच विकी घाबरली. काही काळ काय करावे हेच तिला सूचेनासे झाले. ''हे सर्वात वाईट स्वप्न सत्यात उतरण्यासारखे होते. त्याक्षणी ते खूप वास्तववादी वाटले,''असे विकीने सांगितले.
तिने लगेच गाडीच्या काचा वर केल्या आणि हाय वे असल्याने जवळपास तासभर त्या सापाची धास्ती घेत तिला गाडी चालवावी लागली. तोपर्यंत साप साईड मिररवरून बोनेट व पुढील काचेवर आला होता. विकीची अग्नीपरीक्षाच होती, कारण नजर हटी, दुर्घटना घटी! हा कात्रित ती सापडली होती. तासभरानंतर तिने गाडी बाजूला पार्क केली अन् सापही क्षणाचा विलंब न लावता शेजारीत शेतात निघून गेला. पण, हा तासभराचा प्रवास विकीच्या आयुष्यभर लक्षात राहिल असाच होता.
एका मैत्रिणीच्या घराशेजारील शेतात गाडी पार्क केली असताना हा साप तिच्या गाडीत शिरला असल्याचा अंदाज विकीने व्यक्त केला.