चालक कैक मीटर हवेत उडाला; कार अपघाताचा भीषण VIDEO व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 14:28 IST2022-12-23T14:27:51+5:302022-12-23T14:28:28+5:30

सोशल मीडियावर कार अपघाताचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

driver flew several meters into the air; Terrible video of car accident viral | चालक कैक मीटर हवेत उडाला; कार अपघाताचा भीषण VIDEO व्हायरल...

चालक कैक मीटर हवेत उडाला; कार अपघाताचा भीषण VIDEO व्हायरल...

Terrible Car Accident: जगभरात दररोज हजारो रस्ते अपघात होतात. यातील काही अपघात हृदय पिळवटून टाकणारे असतात. सध्या अशाच एका भीषण कार अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा अपघात किती भीषण होता, याचा अंदाज यावरुन लावता येईल की, कारचालक अनेक मीटर हवेत उडाला आणि रस्त्यावर आपटला. 

व्हायरल होणारी ही क्लिप केवळ काही सेकंदांची आहे, पण ती पाहिल्यावर तुमच्याही अंगावर काटा येईल. हायवेवर अनेक वाहने भरधाव वेगाने धावत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. अचानक समोरून येणारी कार अनियंत्रित होऊन विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना धडकते. टक्कर झाल्यानंतर अनेकवेळा कार उलटल्याचे तुम्ही पाहू शकता. यादरम्यान, कार चालक हवेत कित्येक मीटर उडतो आणि दूरवर पडतो. हा अपघात पाहता ती व्यक्ती वाचली असेल असे वाटत नाही.

कार अपघाताचा व्हिडिओ 

ट्विटरवर @ViciousVideos या हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 9 सेकंदांच्या या क्लिपला आतापर्यंत 40 हजार व्ह्यूज आले आहेत. हा व्हिडीओ पाहून बहुतांश यूजर्स हैराण झाले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलत आहेत. एकाने लिहिले आहे, मला वाटत नाही की त्याने सीट बेल्ट वापरला आहे. आणखी एका यूजरने कमेंट करताना लिहिले आहे, तो जिवंत आहे का? आणखी एका यूजरने लोकांना आवाहन करताना लिहिले आहे की, कार चालवताना नेहमी सीट बेल्टचा वापर करा. कारण, अपघातानंतर पश्चात्ताप करण्याची संधीच मिळणार नाही.

Web Title: driver flew several meters into the air; Terrible video of car accident viral