गिफ्ट तोंडात धरून लोकांची वाट बघतोय 'हा' डॉल्फिन, पण लोकच येत नाहीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 01:26 PM2020-05-23T13:26:56+5:302020-05-23T13:27:02+5:30

सगळीकडे लॉकडाउन आहे त्यामुळे लोक या कॅफेत फार येत नाहीत. पण डॉल्फिन गिफ्तसोबत पाहुण्यांची वाट बघत आहे.

Dolphins in Australia has been bringing gifts from sea for guest photo goes viral api | गिफ्ट तोंडात धरून लोकांची वाट बघतोय 'हा' डॉल्फिन, पण लोकच येत नाहीत!

गिफ्ट तोंडात धरून लोकांची वाट बघतोय 'हा' डॉल्फिन, पण लोकच येत नाहीत!

Next

डॉल्फिनचा एक फोटो सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यात एक डॉल्फिन समुद्रातील कचरा तोंडात धरून किनाऱ्यावर आणत आहे. पण या फोटोची खास बाब ही आहे की, ज्या प्रकारे ही डॉल्फिन समुद्रातून कचरा बाहेर आणत आहे, ते बघून असं वाटतं की, तो जणू गिफ्ट घेऊन त्याच्या गेस्टची वाट बघत आहे.

डॉल्फिनचा हा सुंदर फोटो बार्नकल्स कॅफेने त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केलाय. या फोटोत तुम्हाला स्पष्टपणे बघायला मिळतं की, कशाप्रकारे डॉल्फिन त्याच्या तोंडात समुद्री कचरा जसे की, बॉटल, कोरल, समुद्रातील सुंदर दगड, लाकडाचे तुकडे किनाऱ्यावर घेऊन येत आहे.

बार्नकल्स कॅफे आणि डॉल्फिन फिडिंग कॅफेमध्ये काम करणाऱ्या लोकांशी बोलल्यावर त्यांनी सांगितले की, हमबॅक डॉल्फिन सामान्यपणे लोकांसोबत लगेच मिसळतात. सगळीकडे लॉकडाउन आहे त्यामुळे लोक या कॅफेत फार येत नाहीत. पण डॉल्फिन गिफ्तसोबत पाहुण्यांची वाट बघत आहे.

या कॅफेत डॉल्फिनची देखरेख करणाऱ्या 29 वर्षीय लिन मॅकफर्सनने एबीसी न्यूजला सांगितले की, डॉल्फिन त्याच्या तोंडात समुद्रातील कोरल आणि सी सेल्स किनाऱ्यावर आणतो. आणि आम्ही त्याबदल्यात त्याला खायला मासे देत आहोत.

डॉल्फिनचा हा अनोखा अंदाज पाहून लोकांना वाटेल की आम्ही त्याला ट्रेनिंग दिलं. पण आम्ही त्याला असं कोणतंही विशेष ट्रेनिंग दिलेलं नाही. मॅकफर्सननुसार, डॉल्फिन इतकी समजदार असते की, तो एकावेळी 10 वस्तू तोंडात धरून आणू शकते. जेणेकरून लोक त्याला बघून आनंदी होतील. सोबतच डॉल्फिन हा विश्वास देतो की, तिच्याकडे आणखीही गिफ्ट आहे.

डॉल्फिनचा हा फोटो पाहून एक गोष्ट नक्की स्पष्ट झाली की, लॉकडाउनमध्ये तो लोकांना फार मिस करतोय. एका फेसबुक पोस्टमध्य बार्नाकल्स कॅफे आणि डॉल्फिन फीडिंगने लिहिले की, बघा डॉल्फिन कशाप्रकारे गिफ्ट घेऊन येतो.

हा फोटो सोशल मीडियातून चांगला पसंत केला जात आहे. आतापर्यंत या फोटोंना 2 हजारांपेक्षा जास्त लाइक्स आणि 200 पेक्षा जास्त कमेंट मिळाल्या आहेत. 

Web Title: Dolphins in Australia has been bringing gifts from sea for guest photo goes viral api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.