हॉस्पिटलमध्ये बेघर व्यक्तीवर सुरु होते उपचार, विचारपूस करण्यासाठी पोहोचले हे खास मित्र!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 12:02 IST2018-12-18T12:00:50+5:302018-12-18T12:02:36+5:30
कुत्रा आणि मनुष्याच्या मैत्रिची कितीतरी उदाहरणे तुम्ही पाहिली किंवा ऐकली असेल. या अनेक उदाहरणांमध्ये आणखी एक उदाहरण जोडलं गेलं आहे.

हॉस्पिटलमध्ये बेघर व्यक्तीवर सुरु होते उपचार, विचारपूस करण्यासाठी पोहोचले हे खास मित्र!
कुत्रा आणि मनुष्याच्या मैत्रिची कितीतरी उदाहरणे तुम्ही पाहिली किंवा ऐकली असेल. या अनेक उदाहरणांमध्ये आणखी एक उदाहरण जोडलं गेलं आहे. झालं असं की, ब्राझीलमध्ये एका बेघर व्यक्तीची तब्येत बिघडली आणि त्याला रुग्णालयात उपाचारासाठी नेण्यात आलं. त्यावेळी त्या व्यक्तीचे चार मित्र म्हणजेच रस्त्यावर राहणारी ४ कुत्री तिथे दारात त्याची वाट पाहत उभे होते.
सध्या ही अनोखी कहाणी सोशल मीडियात चांगलीच व्हायरल होत आहे. या कुत्र्यांना पाहून मनात इतकंच आलं की, जणू हे कुत्रेच त्या व्यक्तीचा परिवार आहेत.
ही घटना आहे ब्राझीलच्या रियो डू सूलची. एका रिजनल हॉस्पिटलमध्ये एका बेघर व्यक्तीवर उपचार सुरु होते. या व्यक्तीतं कुणीही नाहीये. तो एकटा आहे. पण हॉस्पिटलच्या दरवाज्याबाहेर ही चार कुत्री त्याची वाट बघत उभे होते.
या हॉस्पिटलची नर्स क्रिस मेमप्रिमने याची फेसबुक पोस्ट लिहिली आहे. तिने लिहिले की, हॉस्पिटलमध्ये सीजर नावाच्या बेघर व्यक्तीवर उपचार सुरु होते. रात्रीचे तीन वाजले होते. दरम्यान त्या व्यक्तीचे चार मित्र जे त्या व्यक्तीसोबत रस्त्यावर राहतात ते आले. नर्सने लिहिले की, या व्यक्तीकडे काहीच नाहीये. त्याला जगण्यासाठी या त्याच्या मित्रांवर निर्भर रहावं लागतं. या उदाहरणावरुन हेच दिसतं की, प्रेम किती मोठी गोष्ट आहे.