शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

माकड-कुत्र्यांच्या गँगवॉरमध्ये आणखी एक व्हिडिओ, माकडाला चोरी करायला मदत करतोय कुत्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 18:51 IST

माकड आणि कुत्र्याचा एक मजेशीर व्हिडिओ (Funny Video of Monkey and Dog) लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू येईल.

कुत्रे आणि माकडं यांच्यात सुरू असलेलं टोळीयुद्ध (Dog and Monkey Gang War) सध्या चांगलंच चर्चेत आहे. यामुळे ट्विटरवर MonkeyVsDog हा हॅश्टॅगही चांगलाच ट्रेंड झाला आहे. माकड आणि कुत्र्यांच्या या गँगवॉरवरुन लोक सोशल मीडियावर अतिशय विनोदी मीम्स शेअर करत आहेत. तर अनेकजण यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. मात्र यासर्वादरम्यान माकड आणि कुत्र्याचा एक मजेशीर व्हिडिओ (Funny Video of Monkey and Dog) लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू येईल.

अनेकदा आपण सर्वांनी ऐकलं असेल की मैत्री कधीही रंग, रूप किंवा जात पाहून केली जात नाही. ती आपोआपच होत असते. याच कारणामुळे या नात्याला पवित्र मानलं जातं. प्रेम आणि विश्वासावरच हे नातं अवलंबून असतं. आजपर्यंत तुम्ही मैत्रीच्या अनेक कथा ऐकल्या असतील. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात कुत्रा आणि माकड मिळून एका दुकानात चोरी करत असल्याचं दिसतं (Monkey Stealing Chips from Shop).

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं, की माकड अगदी मजेत आपल्या मित्राच्या म्हणजेच कुत्र्याच्या पाठीवर बसलं आहे (Friendship of Dog and Monkey). हा कुत्रा माकडाला पान टपरीजवळ घेऊन जातो. इथे जात दोघंही चिप्सचं पॅकेट चोरण्याचा प्लॅन करतात. यासाठी माकड कुत्र्याच्या पाठीवर उभा राहून चिप्स चोरण्याचा प्रयत्न करतं. मात्र पहिल्या प्रयत्नात ते अपयशी ठरतं आणि खाली कोसळतं. यानंतर पुन्हा हे माकड कुत्र्याच्या पाठीवर चढून चिप्स चोरण्याचा प्रयत्न करतं. तिथेच उपस्थित एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ शूट केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हा मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर naughty.raa नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 10 लाखहून अधिकांनी लाईक केला आहे. अनेकांनी ही अतिशय खास मैत्री असल्याचं म्हणत व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं, या दोघांची मैत्री पाहून मला माझ्या लहानपणीच्या मित्राची आठवण आली. तर दुसऱ्या यूजरने लिहिलं, या मैत्रीला सलाम. आणखी एकाने लिहिलं, या व्हिडिओला partner in crime असं कॅप्शन द्यायला हवं.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया