डॉक्टरांनी मायक्रोस्कोपमधून दाखवला दोन व्यक्तींच्या स्पर्ममधील फरक, बघून सगळेच अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 16:43 IST2025-03-11T16:42:47+5:302025-03-11T16:43:36+5:30
Viral Video : कामाचा वाढता ताण, धावपळ, स्ट्रेस, डिप्रेशन यामुळे कपलला बाळ होण्यास समस्या होतात. स्पर्म काउंटवरही या गोष्टीं भरपूर प्रभाव पडतो. स्पर्म काउंटवर आणखी एका गोष्टीचा सगळ्यात जास्त प्रभाव पडतो तो म्हणजे स्मोकिंगचा.

डॉक्टरांनी मायक्रोस्कोपमधून दाखवला दोन व्यक्तींच्या स्पर्ममधील फरक, बघून सगळेच अवाक्...
Viral Video : आजकाल जगभरात पुरूषांमध्ये स्पर्म काउंट असणं ही एक गंभीर समस्या बनली आहे. याच कारणांनं अनेक कपल इच्छा असूनही बाळांना जन्म देऊ शकत नाहीये. त्यानंतर त्यांना ट्रिटमेंटसाठी हॉस्पिटलमध्ये लाखो रूपये खर्च करावा लागतो. कामाचा वाढता ताण, धावपळ, स्ट्रेस, डिप्रेशन यामुळे कपलला बाळ होण्यास समस्या होतात. स्पर्म काउंटवरही या गोष्टीं भरपूर प्रभाव पडतो. स्पर्म काउंटवर आणखी एका गोष्टीचा सगळ्यात जास्त प्रभाव पडतो तो म्हणजे स्मोकिंगचा.
एका महिला डॉक्टरनं याबाबत सत्य दाखवण्यासाठी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. कपलला बाळ का होत नाही हे समजावून सांगण्यासाठी डॉक्टरनं चक्क एक प्रयोग करून दाखवलं. स्मोकिंगमुळं बाळ होऊ शकत नाही. पण केवळ महिलाच नाही तर पुरूषांनीही स्मोकिंग केलं तरी सुद्धा ही समस्या होते. याचा पुरावा डॉक्टरनं मायक्रोस्कोपमधून दाखवला.
महिला डॉक्टरनं हे दाखवण्यासाठी एक प्रयोग लोकांसोबत शेअर केला. यात डॉक्टरनं दोन डब्यात स्पर्म आणले. एका डब्यात स्मोकिंग न करणाऱ्या व्यक्तीचं स्पर्म होतं, तर दुसऱ्या डब्यात स्मोकिंग करणाऱ्या व्यक्तीचं. हे दोन्ही सॅम्पल डॉक्टरनं मायक्रोस्कोपमध्ये टाकले. तेव्हा त्यातील फरक दिसून आला.
या प्रयोगासाठी डॉक्टरनं सगळ्यात आधी हेल्दी व्यक्तीचं स्पर्म मायक्रोस्कोपमध्ये टाकलं. यात आढळून आलं की, व्यक्तीचे अनेक स्पर्म स्क्रीनवर हालचाल करताना दिसत आहे. जे महिलेच्या शरीरात जाऊन बाळाचं रूप घेऊ शकतात. त्यानंतर स्मोकिंग करणाऱ्या व्यक्तीचं स्पर्म बघण्यात आलं. त्याच्या स्पर्मची क्वालिटी खराब होती. कारण त्यातील एक-दुसरेच स्पर्म हालचाल करत होते. याद्वारे डॉक्टरनं हे दाखवलं की, ही बाब कशाप्रकारे गर्भधारणेला प्रभावित करते.