५० तासांच्या ड्युटीनंतर डॉक्टर सून घरी आली; सासूने ओवाळली आरती, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 21:19 IST2026-03-26T20:24:53+5:302026-03-26T21:19:33+5:30

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत ५० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून, सासू-सुनेच्या या केमिस्ट्रीची सर्वत्र चर्चा आहे.

Doctor daughter-in-law comes home after 50 hours of duty; Mother-in-law waves Aarti, Video goes viral | ५० तासांच्या ड्युटीनंतर डॉक्टर सून घरी आली; सासूने ओवाळली आरती, Video व्हायरल

५० तासांच्या ड्युटीनंतर डॉक्टर सून घरी आली; सासूने ओवाळली आरती, Video व्हायरल

आजच्या धकाधकीच्या युगात डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी अहोरात्र सेवा बजावत असतात. अनेकदा त्यांना सलग कित्येक तास ड्युटी करावी लागते. अशाच एका प्रचंड मोठ्या शिफ्टनंतर घरी परतलेल्या एका डॉक्टर सुनेचे तिच्या सासूने ज्या पद्धतीने स्वागत केले, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

काय आहे नेमका प्रकार?

डॉ. सौम्या गुप्ता या प्लास्टिक सर्जन असून, नुकतीच त्यांनी रुग्णालयात सलग ५० तासांची प्रदीर्घ ड्युटी पूर्ण केली. दोन दिवसांहून अधिक काळ रुग्णसेवेत घालवल्यानंतर जेव्हा त्या घरी परतल्या, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी सासूबाई आरतीचे ताट घेऊन दारातच उभ्या होत्या. सौम्या यांना पाहताच सासूबाईंनी आनंदाने त्यांची आरती ओवाळली आणि "आमचे भाग्य मोठे, जे तुम्ही आमच्या घरी आलात," असे म्हणत त्यांचे स्वागत केले.

प्रेम की टोमणा? नेटिझन्समध्ये दोन गट

या व्हिडिओने इंटरनेटवर एक नवीन वादविवाद छेडला आहे. व्हिडिओमध्ये सासूबाई गंमतीने असेही म्हणतात की, "अशी सून पाहिली आहे का, जी चार-चार दिवसांनी घरी येते?" यावर सौम्या हसून सासूबाईंचा आशीर्वाद घेतात आणि म्हणतात, "देव त्यांना (सासूबाईंना) मला घरात जास्त वेळ ठेवण्याची बुद्धी देवो." काही युजर्सना सासू-सुनेमधील हा प्रेमळ संवाद आणि विनोद आवडला आहे, तर काहींनी याला 'टोमणा' असे संबोधले आहे. "बिचारी मुलगी इतकी थकली आहे आणि तरीही तिला असे ऐकावे लागते," अशा कमेंट्स काही लोकांनी केल्या आहेत.


पतीनं केला खुलासा

सोशल मीडियावरील हा वाद वाढताना पाहून सौम्या यांचे पती शगुन अग्रवाल यांनी स्पष्ट केले की, हे केवळ थट्टेने केलेले संभाषण होते. ज्यांनी आपल्या आयुष्यात असे सकारात्मक आणि हलके-फुलके वातावरण पाहिले नाही, त्यांनाच यामध्ये नकारात्मकता दिसत आहे. एकंदरीत, कामाचा ताण आणि कुटुंबाचा पाठिंबा यांचा सुंदर मेळ या व्हिडिओत पाहायला मिळतो. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत ५० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून, सासू-सुनेच्या या केमिस्ट्रीची सर्वत्र चर्चा आहे.

Web Title : 50 घंटे ड्यूटी के बाद डॉक्टर बहू घर लौटी; सास ने की आरती।

Web Summary : 50 घंटे की शिफ्ट के बाद, एक डॉक्टर का सास ने आरती से स्वागत किया। वीडियो ने बहस छेड़ दी, कुछ को स्नेह दिखा तो कुछ को डॉक्टर के लंबे घंटों के बारे में चंचल बातचीत में व्यंग्य दिखा। पति ने स्पष्ट किया कि यह मज़ाकिया था।

Web Title : Doctor daughter-in-law home after 50-hour duty; mother-in-law welcomes her.

Web Summary : After a 50-hour shift, a doctor's mother-in-law welcomed her with an aarti. The video sparked debate, with some seeing affection and others sarcasm in the playful exchange about the doctor's long hours. The husband clarified it was lighthearted.