Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 17:12 IST2025-11-05T17:10:47+5:302025-11-05T17:12:13+5:30
Reddit Viral Story: एका विवाहित महिलेने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर आपला धक्कादायक अनुभव सांगितला.

AI Image
ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्समधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे, ज्यामुळे येथील एका विवाहित जोडप्याच्या नात्याचा पायाच हादरला आहे. एका विवाहित महिलेने उत्सुकतेपोटी केलेली साधी डीएनए चाचणी त्यांच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट ठरले.
महिलेला लहानपणापासूनच माहित होते की, तिचा जन्म शुक्राणू दात्याच्या माध्यमातून झाला आणि तिच्या पालकांनी ते कधीही लपवले नव्हते. डीएनए चाचणी केल्याने तिला तिच्या मुळांबद्दल अधिक माहिती मिळेल, अशी तिची अपेक्षा होती. जेव्हा चाचणीचा निकाल आला, तेव्हा तो तिच्या पतीच्या डीएनएशी जुळला. प्रयोगशाळेतील चूक असावी, असे वाटून पुन्हा चाचणी केली असता, अधिक धक्कादायक सत्य समोर आले, तिचे सासरेच हे तिचे शुक्राणू दाता आहेत, असे समजले. याचा अर्थ, ही विवाहित महिला आणि तिचा पती जैविकदृष्ट्या सावत्र भावंडे निघाले आहेत.

महिलेने रेडिटवर तिची कहाणी शेअर केली असून, तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "मी माझ्या पतीवर खूप प्रेम करते. आम्ही एकत्र एक सुंदर जीवन निर्माण केले आहे आणि आम्हाला दोन मुले आहेत. परंतु, या सत्याने सर्वकाही बदलले आहे. असे वाटते की, आमच्यात थोडा दूरावा निर्माण झाला आहे," असे महिलेने लिहिले आहे. हे अनपेक्षित सत्य पचवण्यासाठी जोडपे सध्या सल्लागाराचा सल्ला घेत आहेत आणि हे सत्य मानसिकरित्या स्वीकारण्याचा प्रयत्न करत आहेत.