डीजेवरच्या गाण्यामुळे नवरदेवाला आली गर्लफ्रेन्डची आठवण; लग्न मोडून घरी परत नेली वरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 11:55 IST2025-04-28T11:50:59+5:302025-04-28T11:55:26+5:30

दिल्लीत एका नवरदेवाने डीजेवरील गाणं ऐकून लग्न मोडल्याचा दावा केला जात आहे.

DJ played song that the groom remembered his ex girlfriend got emotional and cancelled the wedding | डीजेवरच्या गाण्यामुळे नवरदेवाला आली गर्लफ्रेन्डची आठवण; लग्न मोडून घरी परत नेली वरात

डीजेवरच्या गाण्यामुळे नवरदेवाला आली गर्लफ्रेन्डची आठवण; लग्न मोडून घरी परत नेली वरात

Social Viral: देशभरात सध्या लग्नसराईचा हंगाम आहे. लोक लग्नासाठी तयारी अनेक महिने आधीच सुरू करतात. लग्नांमध्ये लोक त्यांच्या नातेवाईकांसह मित्रपरिवाराला आमंत्रित करतात ज्यांना ते अनेक वर्षांपासून भेटले नाहीत. त्यामुळे भारतातील विवाह सोहळे हे लोकांसाठी मेळाव्यांसारखेच असतात. यावेळी उपस्थित नसलेल्या किंवा दूर गेलेल्या लोकांच्या आठवणी काढून लोक भावुक देखील होतात. मात्र दिल्लीत एका गाण्यामुळे नवरदेव एवढा भावुक झाला की त्याने लग्नच मोडून टाकले आणि वरात माघारी नेली. सोशल मीडियावर चित्रपटाच्या गाण्यामुळे नवरदेवाने लग्न मोडल्याची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे.

दिल्लीतील एक नवरदेव इतका भावनिक झाला की त्याने अचानक त्याचे लग्नच मोडले. लग्नात डीजेन 'ऐ दिल है मुश्किल' या बॉलिवूड चित्रपटातील चन्ना मेरेया हे गाणे वाजवले आणि नवरदेव भावुक झाला आणि त्याने टोकाचा निर्णय घेतला. व्हायरल पोस्टमध्ये नवरदेवाला हे गाणं ऐकू त्याच्या जुन्या प्रेयसीची आठवण आली आणि त्याने लग्न मोडले असा दावा केला जात आहे. चन्ना मेरेया हे गाणे ऐकल्यानंतर वराने लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि वरातीसह तो घरी परतला. महत्त्वाची बाब म्हणजे हा प्रकार कळल्यानंतर दिग्दर्शक करण जोहरनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

या घटनेची माहिती गौरव कुमार गोयल याने इंस्टाग्राम पेज Sarcasmic वर शेअर केली आहे. हे शेअर केलेल्या पोस्टवर, 'गाणे सुरू होताच वर भावुक झाला. जुन्या आठवणींना उजाळा देत त्याने लग्न रद्द करण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत लग्नाची वरात कार्यक्रमस्थळी पोहोचली होती,' पण नंतर ती वधूशिवाय परतली, असे म्हटलं आहे.


ऐ दिल है मुश्किल चित्रपटाचा दिग्दर्शक करण जोहरन व्हायरल झालेल्या लग्नाच्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. इंस्टाग्राम स्टोरीवर त्याने आश्चर्य व्यक्त करत फक्त “Huh???" असं म्हटलं आहे.

दरम्यान, ही घटना कधी आणि कुठे घडली याची माहिती पोस्टमध्ये दिलेली नाही. पण ही पोस्ट व्हायरल होताच लोकांनी त्यावर जोरदार कमेंट करायला सुरुवात केली. अनेकांनी डीजेचे आभार मानले आहेत. एका नेटकऱ्याने, लग्नाआधी वराला हे कळले हे बरे झाले, अन्यथा दोन आयुष्ये उद्ध्वस्त झाली असती, असं म्हटलं. तर दुसऱ्या एका युजरने नवरदेवाने स्वतःला रणबीर कपूर समजून मोठी चूक केली आहे, असं म्हटलं.

Web Title: DJ played song that the groom remembered his ex girlfriend got emotional and cancelled the wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.