दिवाळीच्या साफसफाईत आईला सापडला 'खजिना'; २ हजारांच्या तब्बल २ लाखांच्या नोटा, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 10:48 IST2025-10-14T10:48:04+5:302025-10-14T10:48:22+5:30

एका कुटुंबाला दिवाळीच्या साफसफाईदरम्यान २००० रुपयांच्या नोटा सापडल्या आहेत.

diwali cleanup uncovers treasure 2 lakh worth of 2000 rupee notes found old dth box | दिवाळीच्या साफसफाईत आईला सापडला 'खजिना'; २ हजारांच्या तब्बल २ लाखांच्या नोटा, पण...

दिवाळीच्या साफसफाईत आईला सापडला 'खजिना'; २ हजारांच्या तब्बल २ लाखांच्या नोटा, पण...

दिवाळी जवळ येत असल्याने देशभरातील लोक त्यांच्या घरांची स्वच्छता आणि सजावट करण्यात व्यस्त आहेत. एका कुटुंबाला दिवाळीच्या साफसफाईदरम्यान २००० रुपयांच्या नोटा सापडल्या आहेत. रेडिटवर एका युजरने याबाबत पोस्ट केली आहे. युजरने दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीसाठी स्वच्छता करताना त्याच्या आईला घराच्या जुन्या डीटीएच बॉक्समध्ये २ हजारांच्या जुन्या नोटांमध्ये २ लाख सापडले.

"माझ्या वडिलांनी कदाचित नोटबंदीच्या वेळी हे पैसे ठेवले असतील आणि ते विसरले असतील. आम्ही त्यांना अजून याबद्दल सांगितलेलं नाही" असं देखील युजरने म्हटलं आहे. ही पोस्ट रेडिटवर 'Biggest Diwali Safai of 2025' या टायटलसह शेअर करण्यात आली आणि लवकरच ती सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली. अनेक युजर्सनी यावर मजेदार कमेंट केल्या.

एका युजरने "देवाने मला इतके पैसे द्यावेत की मी ते ठेवून विसरू जाईन" असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "या नोटा आरबीआयमध्ये देखील बदलता येतात, परंतु मर्यादा २०,००० रुपयांपर्यंत आहे" असं सांगितलं. "आरबीआयकडे जाण्यापूर्वी तुमच्या चार्टर्ड अकाउंटंट (सीए) चा सल्ला घ्या आणि योग्य कारण स्पष्ट करा" असा सल्ला एकाने युजरला दिला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने १९ मे २०२३ रोजी २००० रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याची घोषणा केली. त्या अजूनही आरबीआयच्या १९ कार्यालयांमध्ये बदलता येतात. आरबीआयच्या मते, २००० रुपयांच्या नोटांचं एकूण मूल्य ₹३.५६ लाख कोटी होते, त्यापैकी ९८.३५% परत आले आहेत, तर अंदाजे ५८८४ कोटी किमतीच्या नोटा अजूनही आहेत.

अहमदाबाद, बंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, पटना, बेलापूर आणि तिरुवनंतपुरम येथील आरबीआय कार्यालयांमध्ये नोटा बदलण्याची सुविधा उपलब्ध आहे.

Web Title : दिवाली की सफाई में मिला खजाना: माँ को मिले 2 लाख!

Web Summary : दिवाली की सफाई के दौरान, एक परिवार को डीटीएच बॉक्स में 2 लाख रुपये के पुराने 2000 के नोट मिले। नोटबंदी के समय रखे ये नोट शायद भुला दिए गए थे, जिससे ऑनलाइन चर्चा छिड़ गई। आरबीआई अभी भी नामित कार्यालयों में 2000 के नोट बदलता है।

Web Title : Diwali Cleaning Surprise: Mom Finds ₹2 Lakh in Old Notes!

Web Summary : During Diwali cleaning, a family discovered ₹2 lakh in old ₹2000 notes hidden in a DTH box. The notes, likely forgotten from demonetization, sparked online buzz. RBI still exchanges ₹2000 notes at designated offices, though most have been returned.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.