चक दे फट्टे! युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने शिखर धवनसोबत केला धमाकेदार भांगडा, धुमाकूळ घालतोय व्हिडीओ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 15:33 IST2021-03-31T15:33:00+5:302021-03-31T15:33:56+5:30
युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) ची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) ने काही वेळापूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गब्बरसोबतचा धमाकेदार डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.

चक दे फट्टे! युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने शिखर धवनसोबत केला धमाकेदार भांगडा, धुमाकूळ घालतोय व्हिडीओ!
टीम इंडियाचा ओपनर शिखर धवनचा (Shikhar Dhawan), लेग स्पीनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) ची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) सोबत भांगडा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) ची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) ने काही वेळापूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गब्बरसोबतचा धमाकेदार डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओत शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) ची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) दोघेही जबरदस्त भांगडा करत आहेत आणि फॅन्सना त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच आवडलाय. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून आतापर्यंत या व्हिडीओला १ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
गब्बरच्या स्टाइलमध्ये भांगडा
हा व्हिडीओ शेअर करत धनश्री वर्माने लिहिले की, 'गब्बरच्या स्टाइलमध्ये भांगडा. सोबत मिळून इन्स्टाग्राम रीलमध्ये आग लावली. जसे की मी आधीच सांगितले होते, एनर्जी बोलते'. युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री व्यवसायाने एक डेंटिस्ट, कोरिओग्राफर आणि यूट्यूबर आहे.
धनश्री वर्माचं डान्ससंबंधी एक यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलचे १५ लाखांपेक्षा जास्त सब्सक्रायबर्स आहेत. धनश्री बॉलिवूड गाण्यांना रिक्रिएट करते. त्यासोबत ती हिपहॉपचं ट्रेनिंगही देते. या चॅनलवर ती तिच्या डान्स अकॅडमीचे व्हिडीओ अपलोड करत असते. धनश्री २०१४ मध्ये डी.वाय.पाटील डेंटल कॉलेज नवी मुंबई येथे शिक्षण घेतलं आहे.