Devotee donated golden sankha and chakra : अरे व्वा! इच्छा पूर्ण झाली म्हणून भक्तानं बालाजी मंदिरात चढवला २ कोटींची सोन्याचा शंख अन् चक्र

By Manali.bagul | Published: February 25, 2021 04:58 PM2021-02-25T16:58:51+5:302021-02-25T17:53:36+5:30

Trending Viral News in Marathi :मंदिरातील एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार भगवान बालाजीची पूजा केल्यानंतर या भक्तानं मंदिराच्या अधिकाऱ्यांकडे साडेतीन किलोग्राम सोन्याचा शंख आणि चक्र दिले आहे.

Devotee in tamil nadu donated golden sankha and chakra worth rs 2 crores to balaji temple in tirumala | Devotee donated golden sankha and chakra : अरे व्वा! इच्छा पूर्ण झाली म्हणून भक्तानं बालाजी मंदिरात चढवला २ कोटींची सोन्याचा शंख अन् चक्र

Devotee donated golden sankha and chakra : अरे व्वा! इच्छा पूर्ण झाली म्हणून भक्तानं बालाजी मंदिरात चढवला २ कोटींची सोन्याचा शंख अन् चक्र

googlenewsNext

भारतात देवधर्म मानणारी माणसं मोठ्या प्रमाणात दिसून येतात.  देवाच्या आशिर्वादानं इच्छा , नवस पूर्ण झाल्यास परतफेड म्हणून काहीही करण्याची लोकांची तयारी असते. तामिळनाडूतील रहिवासी असलेल्या एका भक्तानं बुधवारी आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) तिरूमाला मंदिरात बालाजी मंदिराच्या (Tirupati Balaji Temple) नावानं जवळपास २  कोटी रुपयांचा शंख आणि चक्र दान केले आहे. मंदिरातील एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार भगवान बालाजीची पूजा केल्यानंतर या भक्तानं मंदिराच्या अधिकाऱ्यांकडे साडेतीन किलोग्राम सोन्याचा शंख आणि चक्र दिले आहे. थंगदुरड हे तामिळनाडूतील थेनीचे रहिवासी आहेत. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनसार प्राचीन मंदिरातील मुख्य देवतांना या आभूषणांनी  सजावलं जाणार आहे. अधिकाऱ्यांनी भक्तांच्या हवाल्यानं सांगितले की, ''हा भक्त कोरोनाच्या माहामारीच्या काळात  लागलेल्या लॉकडाऊनमध्ये गंभीर स्वरूपात आजारी पडला होता आणि त्यानं आपली इच्छा पूर्ण झाल्यामुळे  हे दान केलं आहे.'' बापरे! मच्छीमारांच्या जाळ्यात अडकली गरोदर शार्क; पोट फाडल्यानंतर जे बाहेर आलं ते पाहून बसला धक्का

दरम्यान तिरूपती मंदिरात सोन्याच्या दागिन्यांचे दान अनेकदा दिले जाते. त्यासाठी दानाच्या बाबतीत  हे मंदिर भारतात पहिल्या स्थानी आहे. प्रत्येकवर्षी लाखो लोक या मंदिरात येऊन तिरूमालाच्या पर्वतांवर मंदिरात भगवान वेंगटेश्वराचा आशिर्वाद  घेण्यासाठी एकत्र जमतात. याठिकाणी येत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला भगवान वेंकटेश्वराचे (भगवान विष्णु) दर्शन घेण्याची इच्छा असते.  हाय हिल्स घालून ती धाव धाव धावली; कधीही पाहिला नसेल असा स्टंट, व्हिडीओ झाला तुफान व्हायरल

Web Title: Devotee in tamil nadu donated golden sankha and chakra worth rs 2 crores to balaji temple in tirumala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.