आपली एक वेगळी खास देशी स्टाईल तयार करणं आणि फॉलो करणं फारच कठीण काम असतं. बरं तुम्हाला हा देशीपणा जमला तर तुमच्या गोष्टी आपोआप सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागतात. एक ना असाच देशीपणा दाखवणारं लग्नाचं भन्नाट कार्ड व्हायरल झालं आहे. हे एखाद्या फारच दिलखुलास व्यक्तीने तयार केलं असेल असं दिसतं. खरंच हे कार्ड जर व्यवस्थित बघितलं तर हसून हसून पोट दुखेल आणि तुमचं लग्न होणार असेल तर असंच कार्ड छापण्याची तुमची इच्छाही होईल.

अक्षर पाठक नावाच्या एका यूजरने हे कार्ड इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे.

या कार्डमध्ये लिहिलं आहे की, 'जर दीपिका-रणवीर ६ फंक्शन्स करू शकता, प्रियांका-निक ८ फंक्शन्श करू शकतात, तर आम्हीही कमीत कमी तीन रिसेप्शन करू'. तसेच 'आम्ही लग्नासाठी किती खर्च केलाय, हे या कार्डच्या खर्चावरून दिसून येतं. आम्हीही अंबानीपेक्षा कमी नाही'.

या कार्डची खासियत आहे या कार्डची स्क्रीप्ट. यात आणखी एक मुद्दा लिहिला आहे की, 'गिफ्ट अजिबात आणू नका. फक्त कॅश द्या. आम्ही १८ ज्यूसर मिस्कर ग्राइंडरचं काय करणार?'. 

या कार्डमध्ये नेहमीच ठरलेला फॉर्मॅट तुम्हाला कुठेच दिसणार नाही. यातील डायलॉगबाजीने लोकांची मने जिंकली आहेत.


Web Title: This desi shaadi ka card goes viral, people are laughing madly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.