सपनों मैं मिलती है! 'झोमेटो'च्या डिलिव्हरी बॉयचा लग्नाच्या हॉलबाहेर धमाल डान्स, नेटिझन्स झाले खूश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 18:17 IST2022-12-25T18:16:47+5:302022-12-25T18:17:36+5:30
एका डिलिव्हरी बॉयनं आपल्या हटके डान्सनं इंटरनेटवर नेटिझन्सची मनं जिंकली आहेत.

सपनों मैं मिलती है! 'झोमेटो'च्या डिलिव्हरी बॉयचा लग्नाच्या हॉलबाहेर धमाल डान्स, नेटिझन्स झाले खूश
नवी दिल्ली-
एका डिलिव्हरी बॉयनं आपल्या हटके डान्सनं इंटरनेटवर नेटिझन्सची मनं जिंकली आहेत. लग्नमंडपाबाहेर ‘सपने में मिलती है’ या लोकप्रिय गाण्यावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये डिलिव्हरी बॉय मनसोक्त डान्स करताना दिसतो. व्हिडीओमध्ये डिलिव्हरी बॉय एका काचेच्या भिंती पल्याड डान्स करताना दिसतो. 'संगीताला कोणतीही सीमा नसते', अशा कॅप्शननं व्हिडिओ एका नेटिझननं शेअर केला असून त्याचं भरभरुन कौतुक केलं जात आहे.
व्हायरल झालेला व्हिडिओ एका लग्न सोहळ्यातील असून जिथं वऱ्हाडी मंडळी 'सपने में मिलती है' या लोकप्रिय गाण्यावर स्टेजवर नाचत होते आणि मजा घेत होते. पण त्याचवेळी लग्न मंडपाबाहेरील मैदानात एक डिलिव्हरी बॉयही या क्षणाचा आनंद लुटत होता. त्याच्या खांद्यावर डिलिव्हरी बॅग टांगलेली होती.
या व्हिडिओवर भरभरुन कमेंट्स केल्या जात आहेत. एका इंस्टाग्राम यूझरनं व्हिडिओवर “Zomato Vibe Hai” असं म्हटलंय तर एकानं, “डिलिव्हरी बॉयच खरोखर या क्षणाचा आनंद घेत आहे”, अस म्हटलंय.