'राम आयेंगे तो...', तरुणाच्या आवाजानं राम नामाच्या भक्ती रसात दंग झाली दिल्ली मेट्रो 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 15:18 IST2023-12-26T15:16:12+5:302023-12-26T15:18:30+5:30

सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोतील व्हायरल व्हिडीओ चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

Delhi metro youngster sing a song ram aayenge video goes viral on social media  | 'राम आयेंगे तो...', तरुणाच्या आवाजानं राम नामाच्या भक्ती रसात दंग झाली दिल्ली मेट्रो 

'राम आयेंगे तो...', तरुणाच्या आवाजानं राम नामाच्या भक्ती रसात दंग झाली दिल्ली मेट्रो 

Viral Video: दिल्लीमेट्रो नेहमीच चर्चेत असते. राजधानी दिल्लीतीलमेट्रोचे अनेक किस्से सोशल मीडियातून समोर येत असतात. सध्या दिल्ली मेट्रोतील असाच एक व्हायरल व्हिडीओ नेटकऱ्यांना भावला आहे. अलीकडेच वेगवेगळ्या ट्रेंडिंग विषयांनी दिल्ली मेट्रो प्रकाशझोतात आली होती. आता दिल्ली मेट्रोतील आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, या व्हिडिओमध्ये एक तरुण राम आयेंगे भजन गाताना दिसत आहे. 

बहुचर्चित राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त येत्या २२ जानेवारीला ठरला आहे. या ऐतिहासिक सोहळ्याची उत्सुकता प्रत्येकाला आहे. याच पार्श्वभूमीवर या तरुणाने दिल्ली मेट्रोत गायलेल्या गाण्याने नेटकऱ्यांची मनं जिकंली आहेत. 'राम आएंगे तो अंगना सजाऊंगी' हे भजन गात तरुणाने मेट्रो प्रवाशांना मंत्रमुग्ध केले आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओने नेटकऱ्यांच्या भावनांना हात घातला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये, दिल्ली मेट्रोत एक तरुण प्रभु श्री रामाचे भजन गाताना दिसत आहे. तर दुसरीकडे त्याच्या गायनाला गिटार वादक जोड देताना दिसत आहे. सुरेल संगीताची मेजवाणी या तरुणाने नेटकऱ्यांपुढे ठेवली आहे. 

इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.  शिवाय या व्हायरल व्हिडीओला नेटकऱ्यांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे.

पाहा व्हिडीओ - 

Web Title: Delhi metro youngster sing a song ram aayenge video goes viral on social media