Delhi NRI Success Story: कमी वयातच खूप मोठं यश गाठल्याच्या अनेक स्टोरीज नेहमीच समोर येत असतात. ज्यातून प्रेरणा घेऊन इतरही लोक काहीतरी वेगळं करण्याच्या आणि भरपूर पैसे कमावण्याच्या प्रयत्नात असतात. सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवरील एक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. यात दिल्लीत जन्मलेल्या आणि आता कॅनडात राहत असलेल्या एका २९ वर्षीय तरूणाने दावा केलाय की, त्याची एकूण संपत्ती २६ कोटी रूपये झाली आहे. त्याने सांगितलं की, काही वर्षाआधी त्याच्यावर ३० हजार डॉलर म्हणजे साधारण २७.५ लाख रूपये कर्ज झालं होतं. चला जाणून घेऊया काय आहे त्याची कहाणी...
पोस्टनुसार, १७ वर्षाचा असताना शिक्षण आणि कामाच्या शोधात तो दिल्लीतून कॅनडाला गेला. त्याचं बालपण दिल्लीतील एक विभक्त परिवारात गेलं आणि त्याचा सांभाळ त्याच्या आजी-आजोबांनी केला. परदेशात जाऊन त्याने चांगल्या भविष्याची अपेक्षा ठेवली, पण सुरूवातीला त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण त्याने हार मानली नाही.
डोर टू डोर सेल्स
कॅनडामध्ये राहून त्याने घरोघरी जाऊन वस्तू विकण्याचं काम केलं. त्याने लिहिलं की, कडाक्याच्या थंडीत आणि बर्फाच्या वादळात लोकांच्या दारात जाणं फारच अवघड होतं. याच कामातून त्याला सेल्स आणि कम्युनिकेशनचा अनुभव मिळाला. इतकी मेहनत घेतल्यानंतरही त्याच्यावर २३ व्या वयात दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज झालं होतं.
कसं पालटलं नशीब
२४ वयात तो लठ्ठ, कंगाल आणि मानसिक रूपाने तुटलेला होता. त्याचवर्षी त्याने कंटेंट क्रिएशनचा मार्ग निवडला. यू्ट्यूब, टिकटॉक आणि इन्स्टाग्रामवर व्हि़डीओ बनवणं सुरू केलं. त्याने आर्टिफिशिअल इंटॅलिजन्सच्या मदतीने कंटेंट चांगला केला. २५ व्या वर्षी त्याला पहिल्यांदा एका महिन्यात १० लाख रूपयांचा नफा झाला. हाच त्याच्या जीवनाचा टर्निंग पॉइंट ठरला.
कुठे केली गुंतवणूक
आधी त्याने स्टॉक मार्केटमध्ये पैसे लावले होते. पण त्यात त्याला नुकसान झालं. त्यानंतर त्याने स्टॉक मार्केटचा नाद सोडला. त्याने आपली कमाई वेंडिंग मशीन, एआय आधारित बिझनेस आणि रेंटल बिझनेसमध्ये लावले. तो म्हणाला की, त्याने सोनं, चांदी आणि क्रिप्टोसारख्या गोष्टींमध्ये गुंतवणूक केली. अशात त्याची संपत्ती वाढली.
२६ कोटी कसे बनले?
शेवटी त्याने त्याचा एक रेंटल बिझनेस ३ मिलियन डॉलर म्हणजे साधारण २६ कोटी रूपयांना विकला. आता तो फ्लोरिडामध्ये राहतो. आता तो लोकांना आपली कहाणी सांगत आहे, कारण अडचणीच्या काळात लोकांनी आशा सोडू नये. त्याने लिहिलं की, तो आजही विनम्र आहे. कारण त्याने शून्यापेक्षाही खालची स्थिती पाहिली आहे आणि त्याला हेही माहीत आहे की, सगळं गमावलं सुद्धा जाऊ शकतं.
Web Summary : A 29-year-old Delhi native in Canada built a ₹26 crore fortune after overcoming debt. He started with door-to-door sales, then ventured into content creation and strategic investments in vending machines, AI businesses, and real estate, turning his life around.
Web Summary : दिल्ली के एक 29 वर्षीय युवक ने कनाडा में कर्ज से उबरकर ₹26 करोड़ की संपत्ति बनाई। उसने घर-घर जाकर सामान बेचा, फिर कंटेंट बनाया और वेंडिंग मशीन, एआई व्यवसाय और रियल एस्टेट में निवेश करके जीवन बदल दिया।